Advertisement

एसी लोकलमध्ये मालडबा, अपंग डब्यांची संख्या कमी


एसी लोकलमध्ये मालडबा, अपंग डब्यांची संख्या कमी
SHARES

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून मुंबईकरांच्या सेवेत ४७ वातानुकूलित लोकल येत्या काही वर्षांत दाखल होतील. त्यासाठी एमआरव्हीसी’कडून नियोजन सुरू असून ‘आरडीएसओ’कडून एसी लोकलबाबत सूचना घेण्यास सुरुवात झाली आहे. पण एसी लोकलमध्ये मालडबा असावा की नसावा याबद्दल चर्चा केली जात आहे.
लोकलमधील मालडबा आणि अपंग डब्यांपेक्षा एसी लोकलमध्ये या डब्यांची संख्या कमी ठेवण्याचा विचार असल्याची माहिती एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


मालडबा असावा की नसवा?

मुंबईकरांच्या सेवेसाठी ४७ वातानुकूलित लोकल दाखल होतील. मात्र या एसी लोकलमध्ये सध्याच्या लोकलच्या तुलनेत मालडबा आणि अपंग डब्यांची संख्या कमी ठेवण्याचा विचार एमआरव्हीसीकडून करण्यात येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) अंतर्गत मुंबईत ४७ एसी लोकल दाखल करण्याचे नियोजन आहे. परंतु, या बारा डब्यांच्या एसी लोकलमध्ये माल डबा असावा की नसावा, तसेच अपंग डब्यांची संख्या किती असावी यावर चर्चा केली जात आहे. सध्या धावणाऱ्या बारा डबा लोकलमध्ये चार छोटे माल डबे, तर दोन अपंग डबे आहेत.


एसी लोकलमध्ये मालडब्यांची संख्या कमी

एसी लोकलच्या सुरुवातीलाच एकच अपंग डबा ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रेल्वेची रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टँण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) एसी लोकलची बांधणी करणाऱ्या संबंधित कंपन्या तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सूचना प्राप्त करत आहे. या महिन्याच्या अखेपर्यंत सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर ही लोकल बांधण्यासाठीची निविदा काढली जाईल. डिसेंबपर्यंत निविदा काढून ती पुढील वर्षांच्या जून महिन्याच्या आत अंतिम केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

एसी लोकलमध्ये मालडबा नाही, असे सागण्यात आले. रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की, रेल्वेत आताच बदल करा, नाहीतर रेल्वेने माल नेण्याचा मोठा पेच उभा राहील. एसी लोकलमध्ये साध्या लोकलसारखा राखीव डबा मंबई डबेवाल्यांना देण्यात यावा. आता एसी लोकलमध्ये मालडबे असतील. पण त्यात जर कमतरता असेल तर रेल्वेत प्रवशांच्या गर्दीत आम्ही डबे कसे पोहचवणार, व्यवसाय करणारे व्यवसायिक आपला माल कसा पोहचवणार याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा.
- सुभाष तळेकर, प्रवक्ते, डबेवाला असोसिएशन


हेही वाचा -

'परे'च्या जलद मार्गावर धावणार एसी लोकल

एसी लोकलची प्रतिक्षा संपणार, सप्टेंबरपासून प.रेल्वेवर धावणार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा