Advertisement

मोनोच्या खर्चात २३६ कोटींची वाढ

आतापर्यंत या प्रकल्पावर २,१३६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. तर २३६ कोटी रुपये इतका वाढीव खर्च आहे. हा खर्च कसा आणि कशामुळं वाढला याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आलेली नसली तरी प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळेच प्रकल्पाचा खर्च २३६ कोटींनी वाढल्याचं म्हटलं जात आहे.

मोनोच्या खर्चात २३६ कोटींची वाढ
SHARES

सहा ते सात महिन्यांपूर्वी चेंबूर ते वडाळा मोनोमार्गातील मोनोच्या डब्याला पहाटे आग लागली नि या आगीत मोनोचा डबा जळून खाक झाला. त्या दिवसापासून हा मार्ग बंद आहे तो आजतायगात. तर दुसरीकडं वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) मोनो मार्गाचा दुसरा टप्पा काही सेवेत दाखल होण्याचं नाव घेताना दिसत नाही. मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं २०११ मध्ये पूर्ण होणारा दुसरा टप्पा अजूनही पूर्ण झालेला नाही. मोनोच्या दुसऱ्या टप्प्याच्या ११ डेडलाईन चुकल्याने या प्रकल्पाचा खर्च २३६ कोटी रुपयांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे.


आरटीआयअंतर्गत माहिती

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली मोनोच्या प्रकल्प खर्चात झालेल्या वाढीची माहिती समोर आणली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)नं माहिती अधिकाराखाली दिलेल्या माहितीनुसार टप्पा १ आणि टप्पा २ साठी एकूण अपेक्षित खर्च २,४६० कोटी इतका आहे.


उशीर हेच कारण

त्यानुसार आतापर्यंत या प्रकल्पावर २,१३६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. तर २३६ कोटी रुपये इतका वाढीव खर्च आहे. हा खर्च कसा आणि कशामुळं वाढला याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आलेली नसली तरी प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळेच प्रकल्पाचा खर्च २३६ कोटींनी वाढल्याचं म्हटलं जात आहे.वाढीव खर्चाला मान्यता

दरम्यान २३६ कोटींच्या वाढीव खर्चाला एमएमआरडीए प्राधिकरण समितीनं, कार्यकारी समितीनं आणि महानगर आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तर राज्य सरकारकडूनही वाढीव खर्चाला मान्यता मिळाली आहे. हा देशातील पहिलावहिला मोनो प्रकल्प असला तरी दुसरीकडे हाच फेल गेलेला प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो.


मोनो प्रकल्पच गुंडाळला

चेंबूर ते वडाळा मोनोला मुंबईकरांनी नापसंती दर्शवल्यानं मोनो तोट्यात असून आता तर चेंबूर ते वडाळा मार्गही ६ महिन्यांपासून बंद आहे. हा प्रकल्प फेल गेल्याचं लक्षात आल्यानंच याआधीच मोनोच्या ९ मार्गांसह मोनोचा प्रकल्पचं एमएमआरडीएनं गुंडाळला आहे. त्यामुळे आता चेंबूर ते जेकब सर्कल हाच एकमेव आणि शेवटचा मोनो मार्ग असणार आहे.


जनतेच्या पैशांची उधळपट्टी

मुंबईकरांच्या पसंती न उतरलेल्या प्रकल्पावर इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्यानं ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचंच म्हटलं जात आहे. तर योग्य ते नियोजन आणि अभ्यास न करताच प्रकल्प हाती घेण्यात आल्याचीही टीका होत आहे. त्यामुळेच मोनोच्या कामात दिरंगाई करत खर्च वाढवत नेणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांकडून वाढीव खर्च वसूल करावा, अशी मागणी गलगली यांनी यानिमित्तानं केली आहे.हेही वाचा-

मोनोचा दुसरा टप्पा रखडला, एल अँण्ड टी, स्कोमीला दिवसाला साडेसात लाखांचा दंड

६ महिन्यांनंतर मोनो येणार ट्रॅकवर, दुसरा टप्पाही सुरू होणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा