Advertisement

'सीएसएमटी'च्या पुनर्विकासाचं कॉट्रॅक्ट कोणाला मिळणार? 'या' कंपन्या आहेत शर्यतीत

मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

'सीएसएमटी'च्या पुनर्विकासाचं कॉट्रॅक्ट कोणाला मिळणार? 'या' कंपन्या आहेत शर्यतीत
SHARES

मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. याबाबत रेल्वेने योजना आखली असून, या पुनर्विकासाच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गौतम अदानी यांच्या अदानी रेल्वेजसह जीएमआर एंटरप्रायझेस, ओबेरॉयल रियाल्टी यासह एकूण ९ कंपन्या शर्यतीमध्ये आहेत. इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (IRSDC)नं ही माहिती दिली. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंट योजनेंतर्गत या स्टेशनचं रूपांतर एका मिनी स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा विचार आहे.

त्यानुसार, इथं लोक राहतीत, काम करतील, खेळतील आणि ट्रेनमधून प्रवासही करतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल. तसेच व्यवसायाच्या संधीही उपलब्ध होतील. पुनर्विकासानंतर या स्थानकामधून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. तसंच, त्यांचा प्रवासाचा अनुभवही सुधारेल.

या स्थानकावर रिडेव्हलपमेंटचे कॉट्रॅ्क्ट मिळवण्यासाठी लिलावात उतरत असलेल्या ९ कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत. गोदरेज प्रॉपर्टीज, एंकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स, आयएसक्यू आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, मॉरिबस होल्डिंग प्रा.लि. आणि बीआयएफ आयव्ही इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआयएफसी प्रा.लि.

असा होणार पुर्नविकास

  • या स्टेशनच्या पुनर्विकासावर सुमारे १ हजार ६४२ कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. 
  • हा खर्च डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सपोर्ट DBFOT च्या आधारावर काम करेल. 
  • रेल्वे खासगी क्षेत्रातील सहकार्यामधून एकूण १२३ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची योजना आखत आहे. 
  • रेल्वे या ज्या १२३ रेल्वे स्टेशनवर पुनर्विकासाची योजना आखत आहे. त्यापैकी ६३ स्टेशनवर आयआरएसडीसी आमि ६० स्टेशनवर आरएलडीए काम करेल. 
  • या सर्व स्टेशनच्या पुनर्विकासावर सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. 



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा