Advertisement

सीएसएमटी, दादरचे प्रवासी घटले

मुंबईतलं सर्वात गजबजलेलं रेल्वे स्थानक अशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)ची ओळख आहे. परंतु गेल्या ११ वर्षांमध्ये या स्थानकातील प्रवाशांची संख्या ४७.४ टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे. 'सीएसएमटी'सोबतच दादर स्थानकातील प्रवासी संख्या घटली आहे.

सीएसएमटी, दादरचे प्रवासी घटले
SHARES

मुंबईतलं सर्वात गजबजलेलं रेल्वे स्थानक अशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)ची ओळख आहे. परंतु गेल्या ११ वर्षांमध्ये या स्थानकातील प्रवाशांची संख्या ४७.४ टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे. 'सीएसएमटी'सोबतच दादर स्थानकातील प्रवासी संख्या घटली आहे. दक्षिण मुंबईतील कार्यालय उत्तर आणि पश्चिम मुंबईत स्थलांतरीत झाल्याने ही प्रवासी संख्या घटल्याचं म्हटलं जात आहे.

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकातून २००७-०८ मध्ये ८.८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. ही संख्या घटून २०१८-१९ मध्ये ४.६ प्रवाशांवर (४८ टक्के) आली आहे. लांब पल्ल्याच्या गाडीतून आरक्षित तसंच अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २२ लाखांहून १३ लाखांवर आली आहे. म्हणजेच या प्रवाशांच्या संख्येत जवळपास ४१ टक्के घट झाली आहे.

याचसोबत दादर स्थानकातील प्रवाशांची संख्याही घटली आहे. दादरमधून २००७-०८ मध्ये ३.३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यात घट होऊन २०१८-१९ मध्ये प्रवाशांची संख्या २.५ कोटींवर आली आहे. यामध्ये उपनगरीय, लांब पल्ल्याच्या गाड्यातील प्रवासी आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबईतील अनेक काॅर्पोरेट आॅफिस दक्षिण मुंबईतील फोर्ट तसंच नरिमन पाॅईंट इथून शिफ्ट होऊन बीकेसी, अंधेरीत आल्याने दक्षिण मुंबईतील प्रवासी घटल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

स्पाइसजेटची ११ मे पासून मुंबई-दिल्लीतून नवीन १२ उड्डाणे

परिवहन विभागाला ३५० कोटींचं टार्गेट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा