Advertisement

आॅटोरिक्षा, ओला-उबरमध्येही हवं पॅनिक बटन


आॅटोरिक्षा, ओला-उबरमध्येही हवं पॅनिक बटन
SHARES

महिला प्रवाशांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांकडे पाहता आॅटो रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी एवढंच नाही, तर ओला आणि उबरसारख्या खासगी वाहतूक साधनांमध्येही येत्या ६ महिन्यांत 'पॅनिक बटन' बंधनकारक करण्याची शिफारस खटुआ समितीने राज्य सरकारला केली आहे.


वाढत्या घटना

मागच्या काही दिवसांमध्ये महिला प्रवाशांवर अत्याचाराच्या अनेक घटनांनी मुंबई हादरली आहे. मग ते ओला, उबर ड्रायव्हरकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन असो किंवा रेल्वेतील लैंगिक अत्याचाराची घटना असो. टीव्ही कलाकार मल्लिका दुआने काही दिवसांपूर्वीच स्वत:ची घटना सोशल मीडियावर शेअर केली होती. सर्वत्रच महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.


अशी होईल, मदत

त्यामुळे खटुआ समितीने जीपीएस यंत्रणेवर आधारीत पॅनिक बटन सर्व सार्वजनिक गाड्यांमध्ये लावण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून प्रवाशाचे अचूक ठिकाण ओळखून पीडित व्यक्तीला तात्काळ मदत पुरवता येईल.

शिफारसीनुसार ज्या वाहनामध्ये पॅनिक बटन नसेल, त्या वाहनाला प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नवीन वाहन परवाने देणार नाही किंवा परवान्यांचं नूतनीकरण करणार नाही.


वाहतूक व्यवस्था

  • आॅटोरिक्षा १.३९ लाख
  • काळी-पिवळी टॅक्सी ५६,०००
  • ओला, उबर ४ लाख



हेही वाचा -

४ ट्रेनमध्येच आहे पॅनिक बटण! मुंबईत महिलांची सुरक्षा रामभरोसेच!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा