Advertisement

कॅशलेस व्यवहार करताना सांभाळून


कॅशलेस व्यवहार करताना सांभाळून
SHARES

मोदी सरकारने घेतलेल्या कॅशलेस व्यवहारांच्या निर्णयानतंर मुंबईत अनेक ठिकाणी कॅशलेस व्यावहाराला सुरुवात झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनानेही कॅशलेस व्यवहारांची सुरुवात केली होती. कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढत असतानाच काही वेळा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांमुळे फटका बसण्याचेही प्रकार पाहायला मिळत आहे. त्यातच आता लोकल प्रवासात फर्स्ट क्लासचा पास काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या एका प्रवाशाला एका शून्याच्या फरकाने एक लाख रुपयाचा फटका बसलाचल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. आता ही रक्कम परत मिळावी म्हणून प्रवाशाचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.


क्लार्कच्या चुकीमुळे प्रवाशाला फटका

लोकल पाससाठी कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न दहिसरमधील रहिवासी विकास मंचेकर यांना चांगलाच त्रासदायक ठरला. बोरीवली तिकीट खिडकीकडे तिमाही फर्स्ट क्लासचा पास काढण्यासाठी गेलेल्या मंचेकर यांच्या अंधेरी ते बोरीवली पासासाठी 1,330 रुपयांची रक्कम वगळणे आवश्यक होते. पण, क्लार्कच्या चुकीमुळे 1,330 रुपयांऐवजी 1,33,000 रुपये रक्कम कापली गेली. त्यामुळे मंचेकर यांना चांगलाच फटका बसल्याने त्यांनी ही रक्कम परत मिळवण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी एक अर्जही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे सादर केला आहे.

आता हे प्रकरण मुंबई सेंट्रल विभागीय कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, ही रक्कम आर्थिक नफा वा गुन्ह्यातंर्गत वळती केलेली नाही. मात्र या क्लार्कची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

क्रेडिट कार्डातून रक्कम वगळण्यात आल्याने बँकेकडून त्यावर व्याज आकारले जाणार असल्याची चिंता मंचेकर यांना भेडसावत आहे. या साऱ्यात रेल्वेने कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा - 

पसंती कॅशलेस की रोख रक्कमेला ?

हेच का कॅशलेस?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा