Advertisement

लोकलमध्ये दादागिरी करणाऱ्यांवर स्पाय कॅमेऱ्याची नजर!

लोकलच्या दरवाज्यामध्ये उभे राहून बाहेरच्या प्रवाशांना चढू न देणे, आपल्या मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींसाठी आतली जागा अडवून ठेवणे, दरवाज्यात उभे राहून स्टंट करणे असले प्रकार वाढीस लागले होते. आता मात्र आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा बलाने या 'लोकल दादां'वर जालीम उपाय शोधून काढला आहे!

लोकलमध्ये दादागिरी करणाऱ्यांवर स्पाय कॅमेऱ्याची नजर!
SHARES

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दादागिरी करणाऱ्यांचे तसेच स्टंट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लोकलच्या दरवाज्यामध्ये उभे राहून बाहेरच्या प्रवाशांना चढू न देणे, आपल्या मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींसाठी आतली जागा अडवून ठेवणे, दरवाज्यात उभे राहून स्टंट करणे असले प्रकार वाढीस लागले होते. आता मात्र आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा बलाने या 'लोकल दादां'वर जालीम उपाय शोधून काढला आहे!


आरपीएफला मिळणार १४ स्पाय कॅमेरे

लोकलमध्ये दादागिरी आणि स्टंट करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बलाकडून स्पाय कॅमेऱ्यांचा वापर होणार आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांविरोधात या स्पाय कॅमेऱ्यात टिपलेली दृश्य पुरावा म्हणून वापरता येणार आहे. लवकरच मुंबईतल्या आरपीएफ जवानांकडे १४ स्पाय कॅमेरे येणार आहेत.

स्पाय कॅमेरे अनेक प्रकारांमध्ये मिळतात. काही कॅमेरे तुमच्या शर्टाच्या बटणामध्ये किंवा खिशातल्या पेनमध्येही लपवता येतात. अशा कॅमेऱ्यांमधल्या व्हिडिओ पुराव्यांमुळे आरोपीला गुन्हा नाकारता येणार नाही. - वरीष्ठ रेल्वे पोलिस बल अधिकारी


पश्चिम रेल्वेकडे ३८७ कॅमेरे

सध्या पश्चिम रेल्वेकडे महाराष्ट्र आणि गुजरात विभागासाठी एकूण ३८७ बॉडी वोर्न कॅमेरे आहेत. यापैकी ४२ कॅमेरे मुंबई विभागासाठी वापरले जातात. मात्र, बॉडी वोर्न कॅमेऱ्यांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते आकाराने मोठे असतात आणि सहज दिसू शकतात. त्यामुळे समोरची व्यक्ती त्वरीत सावध होते.


लोकलच्या दरवाज्यात दादागिरी

विरार ते अंधेरी या पश्चिम रेल्वेवरील पट्ट्यामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचे लोकल दादागिरी किंवा स्टंटबाजीचे प्रकार दिसून येतात. सुरूवातीच्या स्टेशनवर चढलेला प्रवाशांचा गट दरवाज्यात जागा अडवून उभा रहातो आणि पुढच्या स्टेशन्सवरच्या प्रवाशांना चढू देत नाही. आतल्या बाजूची जागा अशा 'लोकल गुंडां'च्या मित्रांसाठी अडवून ठेवली जाते, अशी माहिती आरपीएफच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.



हेही वाचा

प्रवाशांना जीव गमावण्यापासून परावृत्त करणारा यमराज


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा