Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

रेल्वे, मेट्रो-मोनो रेल्वे आणि बेस्ट बससाठी लवकरच उपलब्ध होणार स्मार्ट कार्ड


रेल्वे, मेट्रो-मोनो रेल्वे आणि बेस्ट बससाठी लवकरच उपलब्ध होणार स्मार्ट कार्ड
SHARES

मुंबईत सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच एकात्मिक तिकीट प्रणालीच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कारण, बेस्ट उपक्रम उपनगरीय रेल्वे, मेट्रो-मोनो रेल्वे आणि बेस्ट या परिवहन सेवांसाठी नोव्हेंबरपासून एकच ‘स्मार्ट कार्ड’ ही एकात्मिक तिकीट प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार आहे. बुधवारी ७ ऑगस्टला ‘बेस्ट दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्तानं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी ही माहिती दिली.

एकात्मिक तिकीट प्रणाली

मुंबई रेल्वे विकास महामंडळानं एकात्मिक तिकीट प्रणालीचा प्रारूप आराखडा रेल्वे महामंडळाकडं मंजुरीसाठी पाठवला आहे. महामंडळही तो मंजूर घेण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यानंतर बेस्टनंही ही प्रणाली राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रथम बेस्ट प्रवाशांसाठी ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. तसंच ही सुविधा काही बसगाड्यांसाठी मर्यादित असणार आहे.

बेस्टचं स्मार्ट कार्ड

उपनगरी रेल्वे आणि मेट्रो-मोनो रेल्वेनं आपली तांत्रिक अडचण दूर केली तर बेस्टचं स्मार्ट कार्ड तिथंही वापरता येणार आहे. मात्र, तस न झाल्यास प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड बेस्ट प्रवासी बसमध्ये वापरता येणार आहे. त्याशिवाय, या स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना तिकीट मिळणार असून प्रवाशांचा बेस्ट प्रवास जलद होणार आहे.हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून संप?

कांग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा शिवसेनेत प्रवेशRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा