ज्येष्ठ प्रवाशांंसाठी एसटीची स्मार्ट कार्ड योजना सुरु

एसटीच्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता कॅशलेस होणार आहे. कारण, एसटी महामंडळाने मुंबई सेन्ट्रल आगारात मंगळवारपासून प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

SHARE

एसटीच्या प्रवाशांचा प्रवास आता कॅशलेस होणार आहे. एसटी महामंडळाने मुंबई सेन्ट्रल आगारात मंगळवारपासून प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. एसटीचे काही प्रवासी बनावट कार्डाचा वापर करून प्रवास करत होते. या बनावट कार्डाला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या प्रवासासाठी रोख रकमेऐवजी स्मार्ट कार्डद्वारे तिकीट काढता येणार आहे. 


बनावट कार्डाला आळा

शासनाने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे. एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांना सवलतीचं साधं कार्ड मिळत असल्यामुळे अनेक प्रवासी बनावट कार्ड बनवून या योजनेचा लाभ घेत असल्याचं निदर्शनास आलं होते. त्यामुळे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. या योजनेर्तंगतआधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


आरक्षण खिडकीवर नोंदणी

या योजनेर्तंगत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना नावनोंदणी आगारातील आरक्षण खिडकीवर करता येणार आहे. नाव नोंदणीवेळी स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तसंच, नोंदणीसाठी वयाचा पुरावा व महाराष्ट्राचे नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यात वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अशा कोणत्याही पुराव्यांपैकी एक आणि आधारकार्ड बंधनकारक असणार आहे. त्यानंतर अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर ठेवून आधार कार्डशी संलग्न माहिती दिल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नोंदणी पुर्ण झाल्यावर पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी प्रवाशांना कार्ड मिळणार आहे.हेही वाचा -

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत 'युपीएससी'चं प्रशिक्षण

अपंगांच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या ६५ हजार प्रवाशांवर कारवाईसंबंधित विषय