Advertisement

१८ मेपर्यंत झाडांची कत्तल नको - सर्वोच्च न्यायालय


१८ मेपर्यंत झाडांची कत्तल नको - सर्वोच्च न्यायालय
SHARES

मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीविरोधातल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यानुसार सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. याप्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी 18 मे रोजी होणार आहे. तोपर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने झाडे कापू नयेत असे निर्देश दिल्याची माहिती याचिकाकर्त्या निना वर्मा यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

फेब्रुवारीमध्ये निना वर्मासह परवीन जहांगीर यांनी मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्वरीत झाडांच्या कत्तलीला स्थगिती देत दोन्ही पक्षांची बाजू एकून घेतली आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो-3 ला हिरवा कंदिल दिला. झाडांच्या कत्तलीवरील स्थगितीही सशर्त उठवली. मात्र त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी याचिकाकर्त्यांना दहा दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी या आदेशाला आव्हान दिले आणि त्यावरील सुनावणी सोमवारी पार पडली. दहा दिवसांची मुदत सोमवारी संपत असल्याने याचिकाकर्त्यांनी झाडांची कत्तल होऊ नये हीच मागणी उचलून धरली. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने 18 मे पर्यंत झाडे कापू नये असे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा

'मेट्रो-3 च्या कामासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करा'

'सेव्ह आरे'साठी सिद्धिविनायकाला साकडं

याचिकाकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

एमएमआरसीला कोर्टाचीही फिकीर नाही?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा