Advertisement

'अशी' करतोय कारवाई, पश्चिम रेल्वेच्या उपमहाव्यवस्थापकांचं राज ठाकरेंना पत्र


'अशी' करतोय कारवाई, पश्चिम रेल्वेच्या उपमहाव्यवस्थापकांचं राज ठाकरेंना पत्र
SHARES

रेल्वे स्थानकाच्या परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाची गंभीर दखल पश्चिम रेल्वेने घेतली आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक परीक्षित मोहनपुरिया यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई, स्थानकांवरील सेवा-सुविधा यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती दिली.


काय लिहिलंय पत्रात?

पश्चिम रेल्वेच्या उपमहाव्यवस्थापक परीक्षित मोहनपुरीया यांनी पत्रात राज ठाकरे यांना रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई, रेल्वे स्टेशनची स्वच्छता, नव्या फूट ओव्हर ब्रिजची बांधणी, महिलांसाठी राखीव डब्यांमधील सुरक्षा व्यवस्था, महिलांसाठी रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे, त्यांची दररोजची सफाई तसेच पश्चिम रेल्वेच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.



कशी आली जाग?

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर ५ ऑक्टोबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे प्रशासकीय कार्यालयावर संताप मोर्चा काढला होता. त्यावेळी रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने राज ठाकरे यांनी महाव्यवस्थापकांना मागण्यांचं निवेदन दिलं होतं. त्यात प्रामुख्याने रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी ठाकरे यांनी आपल्या भाषणात १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. या अल्टीमेटमनुसार अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक आंदोलन हाती घेतलं. यावरून सध्या मनसे विरुद्ध काँग्रेस यांच्या वाद सुरु आहे.



हेही वाचा-

फेरीवाला धोरणात ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच हवे - संदीप देशपांडे

नाहीतर, न्यायालयाच्या अवमानाची केस टाकू: राज ठाकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा