Advertisement

८ महिन्यांत प्रथमच जीएसटीतून १ लाख कोटींचं उत्पन्न

कोरोनामुळे लागू केलेल्या लाॅकडाऊनच्या काळात डळमळीत झालेली अर्थव्यवस्था हळूहळू सावरत असल्याचं आता दिसून येत आहे. जीएसटीचे उत्पन्न १ लाख कोटींवर जाण्याची या आर्थिक वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.

८ महिन्यांत प्रथमच जीएसटीतून १ लाख कोटींचं उत्पन्न
SHARES

कोरोनामुळे लागू केलेल्या लाॅकडाऊनच्या काळात डळमळीत झालेली अर्थव्यवस्था हळूहळू सावरत असल्याचं आता दिसून येत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जीएसटीतून मिळणारा महसूल १ लाख ०५ हजार १५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली. 

जीएसटीचे उत्पन्न १ लाख कोटींवर जाण्याची या आर्थिक वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. ८ महिन्यांत प्रथमच जीएसटी उत्पन्न ऑक्टोबरमध्ये १.०५ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा यंदा जीएसटीतून मिळालेला महसूल दहा टक्के जास्त आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितलं की, ऑक्टोबर २०२० मध्ये एकूण जीएसटीचा महसूल १,०५,१५५ कोटी रुपये राहिला. यामध्ये केंद्रीय जीएसटी १९,१९३ कोटी रुपये तर राज्यांचा जीएसटी २५,४११ कोटी रुपये आहे. तसंच एकत्रित जीएसटी ५२,५४० कोटी रुपये आहे. (आयातीतून मिळालेल्या २३,३७५ कोटी रुपयांसह) तसेच उपकर ८,०११ कोटी रुपये आहे. (आयातीसह एकत्रित ९३२ कोटी रुपयांसह)”

ऑक्टोबर २०१९ मध्ये जीएसटी संकलन ९५,३७९ कोटी रुपये राहिला. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण जीएसटी आर-३ बी रिटर्नची संख्या देखील ८० लाखांवर पोहोचली आहे.  लॉकडाउनमुळे जीएसटी संकलनाचा आकडा सातत्याने अनेक महिन्यांपर्यंत एक लाख कोटी रुपयांच्या खाली राहिला होता.



हेही वाचा -

मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त

मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा