Advertisement

जगातील २५ श्रीमंत कुटुंबांमध्ये भारतातील फक्त अंबानी कुटुंब

भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये फक्त अंबानी कुटुंबाला या यादीत स्थान मिळालं आहे. या कुटुंबाची संपत्ती एका वर्षात ५० हजार कोटी रुपयांनी (७०० कोटी डाॅलर) वाढली आहे.

जगातील २५ श्रीमंत कुटुंबांमध्ये भारतातील फक्त अंबानी कुटुंब
SHARES

जगभरात आर्थिक असमानता वेगाने वाढत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांची यादी पाहिली तर ही बाब प्रकर्षाने दिसून येते. ब्लूमबर्ग  (bloomberg) ने जारी केलेल्या यादीनुसार, जगभरातील सर्वाधिक २५ श्रीमंत कुटुंबांची संपत्ती तब्बल ९९ लाख कोटी रुपये (१.४ लाख कोटी डाॅलर) आहे. या यादीत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) नवव्या स्थानावर आहेत. अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती ३.५ लाख कोटी रुपये आहे. 


वॉल्टन कुटुंब अव्वल

ब्लूमबर्ग (bloomberg) च्या यादीनुसार, वाॅलमार्ट (Walmart) ही रिटेल दुकानांची साखळी चालवणारे वॉल्टन कुटुंब जगात सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहे. या कुटुंबाची संपत्ती १३.५ लाख कोटी रुपये (१९ हजार १०० कोटी डाॅलर) आहे. वाॅल्टन कुटुंब प्रत्येक मिनिटाला ४६ लाख रुपये, प्रत्येक तासाला २८ कोटी रुपये आणि प्रत्येक दिवसाला ६७२ कोटी रुपये कमावते. वाॅल्टन कुटुंबाने मागील एका वर्षात २.७ लाख कोटी रुपये (३९०० कोटी डाॅलर) कमावले आहेत. 


वर्षात ५० हजार कोटी

भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये फक्त अंबानी कुटुंबाला या यादीत स्थान मिळालं आहे. या कुटुंबाची संपत्ती एका वर्षात ५० हजार कोटी रुपयांनी (७०० कोटी डाॅलर) वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance indusrties) चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  हे फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. अमेरिकेतील ०.१ टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीतील मोठा हिस्सा आहे. जगभरातील इतर देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे.  जगातील २५ सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांची संपत्ती मागील एका वर्षात २४ टक्के वाढली आहे. 



हेही वाचा -

Jio Fiber आलं, घरबसल्या बघा 'फर्स्ट डे फर्स्ट शो'!

खूशखबर! आता ‘या’ वेळेत उघडणार बँका




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा