Advertisement

२८ दिवसात माल्ल्याला भारतात आणलं जाणार, ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

बँकांचं तब्बल 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनला फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे.

२८ दिवसात माल्ल्याला भारतात आणलं जाणार,  ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली
SHARES

बँकांचं तब्बल 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनला फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे.  लंडन हायकोर्टानंतर आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टानेही विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रत्यार्पणाविरोधात माल्याचा अखेरचा मार्गही बंद झाला आहे.

प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळल्याने २८ दिवसात माल्ल्याला भारतात आणलं जाऊ शकतं. यासाठी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या ब्रिटनच्या गृह सचिव अंतिम निर्णय घेणार आहेत. यापूर्वीही ब्रिटनच्या तत्कालीन गृह सचिवांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती. पण माल्या याने याविरोधात लंडन हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 

लंडनच्या हायकोर्टात भारतीय यंत्रणांनी स्वतःची बाजू भक्कमपणे मांडली होती. त्यानंतर लंडन हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर विजय मल्ल्याने अखेर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळल्यामुळे त्याचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत. ब्रिटनच्या गृह विभागाकडून प्रत्यार्पणासाठी आता लवकरच अंतिम मंजुरी दिली जाणं अपेक्षित आहे.हेही वाचा -

सर्व कर्ज फेडतो पण खटला बंद करा, विजय मल्ल्याची सरकारला ऑफर

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा