आता महिन्याला 4 रुपयांनी महागणार सिलेंडर!

 Mumbai
आता महिन्याला 4 रुपयांनी महागणार सिलेंडर!

सरकारी तेल कंपन्यांना दर महिन्याला सिलेंडरच्या किंमतीत चार रुपयांची वाढ करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांनी देखील 1 जूनपासून सरकारच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दर महिन्याला एलपीजीच्या किंमतीत 4 रुपयांनी वाढ होणार आहे.

यापूर्वी सरकारने 1 जुलै 2016ला गॅस सिलेंडरच्या किंमती 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तर, सरकारने आतापर्यंत 10 वेळा गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे.

अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 87 रुपयांचा फरक असतो. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती हळूहळू एकसमान होतील. मुंबईत सध्या अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 491.25 रुपये इतकी आहे. ज्यामध्ये या महिन्यापासून चार रुपयांनी वाढ होणार असल्याने येत्या वर्षभरात ती किंमत 550 होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.हेही वाचा -

गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

आधारकार्ड शिवाय सबसिडी नाही


Loading Comments