Advertisement

आयटी रिटर्न भरण्यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न भरण्यासाठी आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयटी रिटर्न भरण्यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
SHARES

आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न भरण्यासाठी आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबद्दल विस्ताराने माहिती देताना काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

 यावेळी त्यांनी आयटी रिटर्न भरण्याच्या ३१ जुलै आणि ३१ ऑक्टोबरच्या अंतिम तारखांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आल्याचे सांगितले. तसंच लेख परीक्षण अहवाल सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरवरून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे.  नोकरदार वर्गासाठी कर विवरण सादर करण्यास मुदतवाढ आवश्यक होती.

फॉर्म-१६ घेणाऱ्या नोकरदारांसाठी १० जून ऐवजी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर नोकरदारांसाठी आयटी रिटर्नसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अवघा एक महिन्याचा कालावधी उरला होता. त्यामुळे रिटर्न फायलिंगला मुदतवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

अर्थमंत्र्यांनी कमी उत्पन्न असणाऱ्या नॉन सॅलरीड उत्पन्नासाठी TDS आणि TCS मध्ये कपात केली आहे. उत्पन्न स्रोताच्या ठिकाणी होणारी थेट करकपात 25 टक्क्यांनी कमी केली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत या कमी दराने कर कापला जाईल. 


हेही वाचा -

सर्व कर्ज फेडतो पण खटला बंद करा, विजय मल्ल्याची सरकारला ऑफर

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा