गुडन्यूज : गॅस सिलेंडर स्वस्त; विनाअनुदानित सिलेंडर १३३ रूपयांनी स्वस्त

अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या असून सर्वसामान्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

SHARE

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्य गॅसवर गेले होते. मात्र, आता हळूहळू इंधनाचे दर कमी होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्यानंतर आता गॅस सिलेंडरच्या किंमतीही गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 


१ डिसेंबरपासून लागू 

अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या असून सर्वसामान्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. अनुदानित गॅस सिलेंडर ६.५ रुपयांनी तर विनाअऩुदानित १३३ रूपयांनी स्वस्त झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे नवी दरवाढ त्वरीत शनिवारी, १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.


सहा महिन्यानंतर घट

मुंबईत सध्या १४.२ किलोच्या अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरची किमत ५०२. ३४ रुपये इतकी आहे. तर विनाअऩुदीत गॅस सिलेंडरचे दर ८८० रुपये आहेत. महिन्याभरापूर्वी अनुदानित गॅस सिलेंडर २.९४ रुपयांनी स्वस्त होता तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर ६० रुपयांनी महागलं होता. गॅस सिलेंडरमध्ये सातत्यानं होणाऱ्या या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असून सिलेंडरचे दर कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. जानेवारीपासून गॅस सिलेंडरचे दर वाढत असून सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या दरात घट झाली आहे. हेही वाचा - 

३१ डिसेंबरच्या आत तुमचे ATM कार्ड बदलून घ्या, नाहीतर...

५ डिसेंबरपासून पॅनकार्डमध्ये होणार 'हे' सहा बदल
संबंधित विषय
ताज्या बातम्या