Advertisement

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, आजपासून CNG-PNG च्या दरात वाढ

नवीन दर एक ऑक्टोबर म्हणजेच आजपासून लागू झाला आहे.

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, आजपासून CNG-PNG च्या दरात वाढ
SHARES

केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची (Prices of natural gas) किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक गॅसची किमत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. नवीन दर एक ऑक्टोबर म्हणजेच आजपासून लागू झाला आहे.

नैसर्गिक गॅसची किमत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. एप्रिल 2022 मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत वाढून 6.10 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली होती.

आता एक ऑक्टोबर 2022 पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. म्हणजेच यामध्ये 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली होती.

घरगुती गॅसच्या दराबरोबर आता वाहतुकीच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आरबीआयनं रेपो रेटच्या दरात वाढ करत सर्वसामान्यांना झटका दिला आता नैसर्गिक गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करत डबल झटका दिला आहे.

नैसर्गिक वायूच्या किंमतीत 1 डॉलरने वाढ झाल्यानंतर सीएनजीच्या दरात साडे चार रुपये प्रतिकिलो इतकी वाढ होते. सीएनजीच्या दरात 12 ते 13 रुपये किलो वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

आता वर्षाकाठी केवळ 15 तर महिन्याला मिळणार दोनच LPG सिलेंडर

नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा