Advertisement

नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी
SHARES

यंदाच्या नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण आणि वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 अन्वये वर्षामध्ये एकूण 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून 13 दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, 2 दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी 1 ऑक्टोबर, 2022 रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, 3 ऑक्टोबर आणि मंगळवार, 4 ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.



हेही वाचा

गरब्यासाठी दोन दिवस रात्री बारापर्यंत परवानगी

आदर स्त्रीशक्तीचा : आदिवासींच्या प्रगतीसाठी लढणारी 'नवदुर्गा'

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा