Advertisement

डिमॅट खाते कसे उघडावे? जाणून घ्या!


डिमॅट खाते कसे उघडावे? जाणून घ्या!
SHARES

शेअरमध्ये गुंतवणूक करताना डीमॅट खाते उघडावे लागते, याबद्दल सर्वांनाच माहीत असेल. पण हे अकाऊंट उघडायचे कसे? याचं टेन्शन जर तुम्ही घेत असाल, तर तसे करण्याची आता काहीच गरज नाही. कारण हे खाते उघडणे इतके अवघड नाही.


खाते उघडण्यासाठी काय कराल?

 • डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपीज) च्या प्रतिनिधीशी संपर्क करा
 • ‘डीपीज’कडे खाते उघडा
 • डीपीची यादी डिपॉझिटरीजच्या वेबसाइटवर उपलब्ध असते
 • शेअर्स प्रमाणपत्रांवर जितकी नावे असतील, तितक्या संयुक्त नावांची खाती ‘डीपीज’कडे उघडावी लागतात
 • डिपॉझिटरीद्वारे व्यवहारासाठी तुम्हाला तुमच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सचे प्रमाणपत्र ‘डिमटेरियलायझेशन’ करावे लागते
 • या प्रक्रियेसाठी तुम्हाला शेअर्सची संख्या, रजिस्टर्ड फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्राचा क्रमांक द्यावा लागतो
 • सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कंपन्यांचे शेअर्स रजिस्ट्रारकडे पाठवले जातात, त्यानंतर हे शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केले जातात
 • हे सर्व व्यवहार संगणक प्रणालीने होतात
 • इलेक्ट्रॉनिक पद्धतीतले हे शेअर्स तुम्हाला कागदी स्वरुपातही मिळू शकतात
 • त्यासाठी ठराविक शुल्क प्रती प्रमाणपत्र भरल्यानंतर तुम्हाला गुंतवणूकदार मिळू शकतो, या प्रक्रियेस ‘रिमटेरियलायझेशन’ म्हटले जाते.
 • शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स किंवा ट्रेडेड फंडचे युनिट्स खरेदी केल्यानंतर हे सर्व तुमच्या डिमॅट खात्यामध्ये लगेच जमा होईल.
 • या व्यवहारांवर मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्याची गरज नसते.
 • तुमचे रोखे, समभाग, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडचे युनिट्स डिपॉझिटरीजमध्ये ठेवणे गरजेचे आहे. हेही वाचा - 

केंद्राचा छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, जीएसटीचे दर निम्म्यावर

इन्फोसिसचे शेअर्स २ वर्षांच्या तळाला, शेअरहोल्डर असाल, तर ही घ्या काळजी…


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा