Advertisement

आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून मुंबईत

आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून मुंबईत
SHARES

आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. आयसीआयसीआय बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय सध्या गुजरातमध्ये वडोदरात आहे. हे मुख्यालय आता मुंबईत हलवण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संचालकांची शनिवार बैठक झाली. यावेळी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.  मुख्यालय जरी मुंबईत हलवणार असलं तरी बँकेचे कोणतेही कर्मचारी किंवा वडोदऱ्यातील कोणत्याच व्यवसायात बदल केलेला नाही. 

गुजरातमधील मुख्यालय मुंबईत हलवल्यामुळे आयसीआयसीआय बँक कार्पोरेट इनकम टॅक्स मुंबईला देणार आहे. केंद्रीय करात वाढ होणार असून तो महाराष्ट्रात येणार आहे. तसेच मोठ्य कार्पोरेट कर्जावर स्टॅम्प ड्युटी देखील महाराष्ट्रात भरली जाणार आहे. या निर्णयाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. बँकेचं मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते तसेच काही औपचारिकता पण पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण केल्या जाव्यात असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मिठाचा वापर, मागणीत प्रचंड वाढ

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा