Advertisement

मेडिक्लेम दाव्यांमुळे कंपन्या हैरान, कोविड पाॅलिसी केल्या बंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या कोविड पॉलिसीचे दावे वाढू लागले आहेत.

मेडिक्लेम दाव्यांमुळे कंपन्या हैरान, कोविड पाॅलिसी केल्या बंद
SHARES

गेल्या वर्षी कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अनेक विमा कंपन्यांनी संधी हेरली आणि विशेष कोविड मेडिक्लेम पॉलिसी सुरू केली. मात्र, वर्षभरात कंपन्यांना या पाॅलिसी बंद कराव्या लागल्या. याचं कारण म्हणजे विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण प्रीमियमच्या रकमेच्या १५० टक्के अधिक रक्कम त्यांना आता दाव्यांपोटी द्यावी लागली आहे. त्यामुळे या कंपन्या घाबरून गेल्या आहेत. विमा कंपन्यांचा नफा कमी आणि क्लेम जास्त होत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या कोविड पॉलिसीचे दावे वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे नवी पॉलिसी घेतलेल्या केवळ २५ टक्केच ग्राहकांनी मेडिक्लेमचे दावे केले आहे. मात्र, या दाव्यांची रक्कम कंपनीला मिळालेल्या एकूण प्रिमियमपेक्षा तब्बल १५० टक्के अधिक आहे. परिणामी विमा कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या पॉलिसींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागेल, हे कंपन्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यामुळे कंपन्यांनी या पॉलिसींचे नूतनीकरण बंद केले आहे. तर बहुतांशी विमा कंपन्यांनी विशेष कोविड मेडिक्लेम पॉलिसी बंद केल्या आहेत.

कंपन्यांच्या या भूमिकेमुळे नवीन पॉलिसी घेणाऱ्या आणि जुनी पॉलिसी रिनिव्ह करणाऱ्यांना आता अडचणी येत आहेत. कंपन्यांनी आता सर्वसाधारण प्रिमियममध्येसुध्दा वाढ केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या अशा पॉलिसी काढणारे संकटात सापडले आहेत. 

मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर कंपन्यांनी कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचार खर्चांसाठी कोरोना कवच मेडिक्लेम पॉलिसीची सुरुवात केली होती. यामध्ये दरमहा ५०० ते ५००० रुपयांचा प्रीमियम भरून संरक्षण देण्यात येत होते. या पॉलिसींचा कालावधी साडेतीन ते नऊ महिन्यांचा आहे. या पाॅलिसीमध्ये ५० हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते.



हेही वाचा -

सीरम इन्स्टिटयूट सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल

एटीएम कार्डशिवायही काढा पैसे, 'ह्या' बँका देत आहेत सुविधा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा