Advertisement

आयटी कंपन्यांना जुलैपर्यंत घरून काम करण्याची सूट

आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या आहेत.

आयटी कंपन्यांना जुलैपर्यंत घरून काम करण्याची सूट
SHARES

आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या आहेत. लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत.

कोरोनाचा वेग वाढतच असल्याने लॉकडाऊनमध्ये सुट मिळाली तरी अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावण्यास इच्छूक नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरून काम करण्याचा पर्याय हा चांगला आहे. त्यासाठी आयटी कंपन्यांना काही नियमांमध्ये सुट हवी आहे. ती सुट त्यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इंटरनेटचा वेग कायम ठेवण्यासाठी भारत नेट मदत करणार असल्याची घोषणाही त्यांनी कली. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर वाढल्याने नेट कंपन्यांवर त्याचा दबाव पडतोय. त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं.



सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा