Advertisement

वाहन कंपन्यांनी निर्मिती थांबवली

कोरोना विषाणूचा फटका सर्वच क्षेत्रांना मोठा बसला आहे. वाहन उद्योगालाही याची झळ आता बसणार आहे.

वाहन कंपन्यांनी निर्मिती थांबवली
SHARES
कोरोना विषाणूचा फटका सर्वच क्षेत्रांना मोठा बसला आहे. वाहन उद्योगालाही याची झळ आता बसणार आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाहन कंपन्यांनी देशातील तसंच परदेशातील आपले प्रकल्प तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकी, महिंद्र, हिरो मोटोकॉर्प, फियाट क्रिसलर, टाटा मोटर्स अशा सर्वच वाहन कंपन्यांनी प्रकल्प बंद केले आहेत. 


महिंद्र अॅण्ड महिंद्र लिमिटेडने  महाराष्ट्रातील नागपूर, चाकण, मुंबईतील कांदिवली येथील प्रकल्प बंद केले आहेत. महिंद्रने यापूर्वीच आपल्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. मारुती सुझुकी इंडियाने हरयाणातील माणेसर व गुरूग्राम येथील आपले कारखाने काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून वर्षाला १५.५ लाख वाहनांची निर्मिती केली जाते. रोहतक येथे असलेले कंपनीचे संशोधन व विकास केंद्रही बंद राहणार आहे.

दुचाकींची निर्मिती करणारी हिरो मोटोकॉर्पने ३१ मार्चपर्यंत राजस्थानातील जयपूर व नीमराणा येथे असलेले प्रकल्प तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बांगलादेश व कोलंबिया येथील प्रकल्पही कंपनी बंद ठेवणार आहे. फियाट क्रिसलर कंपनीने रांजणगावचा प्रकल्प बंद ठेवला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी असलेले कर्मचारीच प्रकल्पात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.

 टाटा मोटर्सने पुणे येथे असलेला मुख्य प्रकल्प बंद केला आहे. टाटा मोटर्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक ग्वान्टेर बुश्चेक यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, कंपनीने अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कारखान्यात तसेच इंजिनीअरिंग संशोधन केंद्रात काम करतात. त्यामुळे त्यांना घरून काम करता येणे शक्य नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांना कामावर उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

Coronavirus Updates:मुंबईतील पेट्रोल पंप केवळ 'इतके' तास सुरू राहणार




 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा