Advertisement

लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात, आरबीआयने लागू केले निर्बंध

अवाजवी कर्जवाटप, अनियमिततेने आर्थिक संकटात सापडल्या लक्ष्मी विलास बँकेवर मंगळवारी ३० दिवसांसाठी निर्बंध घातले आहेत.

लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात, आरबीआयने लागू केले निर्बंध
SHARES

अवाजवी कर्जवाटप, अनियमिततेने आर्थिक संकटात सापडल्या लक्ष्मी विलास बँकेवर मंगळवारी ३० दिवसांसाठी निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी फक्त २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. 

मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. बँकेच्या बुडीत कर्ज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

 लक्ष्मी विलास बँकेमधून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. त्याशिवाय बँकेला पुरेशा प्रमाणात भांडवल उभारण्यात अपयश आले. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. 

मंगळवारी सहा वाजल्यापासून लक्ष्मी विलास बँकेवर पुढील महिनाभरासाठी मोरॅटिरियम लागू करण्यात आल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. याआधी पंजाब महाराष्ट्र बँक आणि येस बँक यांच्यातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेला निर्बंध घालावे लागले होते.



हेही वाचा -

भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्न



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा