Advertisement

एसबीआयने कर्ज केलं स्वस्त, व्याजदरात 'इतकी' कपात

भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. एसबीआयने कर्जावरील व्याजाचे दर कमी केले आहेत.

एसबीआयने कर्ज केलं स्वस्त, व्याजदरात 'इतकी' कपात
SHARES

भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. एसबीआयने कर्जावरील व्याजाचे दर 0.15 टक्क्यांनी कमी केले आहेत. आता एसबीआयचा व्याजदर 7.40 टक्क्यांवरून  7.25 टक्के झाला आहे. कर्जाचे व्याजदर कमी करतान बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केला आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

व्याजदरांमध्ये कपात लागू झाल्यानंतर एमसीएलआर खात्यांशी संबंधित ग्राहकांना लाभ मिळेल. अर्थात एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांसाठी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर त्याच्या ईएमआयमध्ये 255 रुपयांची बचत होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयने नवीन डिपॉझिट स्कीम आणली आहे. याला 'एसबीआय व्ही केअर' असे नाव देण्यात आले आहे.

 बँकेने एफडीच्या व्याजदरांमध्ये सुद्धा कपात केली आहे. नवीन दरानुसार, 3 वर्षांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजात 0.20 टक्के कपात करण्यात आली. सध्या एसबीआय 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.5 फीसदी व्याज देत आहे. तर 46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 4.5 टक्के आणि 180 ते एका वर्षापर्यंतच्या व्याजावर 5 टक्के व्याज दिले जाते. 


हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा