Advertisement

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेकची आणखी १८७५ कोटींची गुंतवणूक

सिल्वर लेक ही अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये आणखी १८७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेकची आणखी १८७५ कोटींची गुंतवणूक
SHARES

सिल्वर लेक ही अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये आणखी १८७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे सिल्वर लेकची रिलायन्स रिटेलमधील एकूण गुंतवणूक ९३७५ कोटी रुपये इतकी होणार आहे. आता सिल्वर लेकची रिलायन्स रिटेलमधील भागीदारी २.१३ टक्के होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमध्ये ३० सप्टेंबरला एकाच दिवशी दोन कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ४ आठवड्यांत रिलायन्स रिटेलमध्ये एकूण ४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. बुधवारी जनरल अटलांटिक या अमेरिकेतील खासगी इक्विटी फर्मने रिलायन्स रिटेलमध्ये ३६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमधील १.७५ टक्के हिस्सेदारी ७,५०० कोटी रुपयांनी खरेदी केली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, भारतीय ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक आणि त्यांच्या सहकंपनीने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आमचा विश्वास आणखी वाढला असून आम्हाला आधार मिळाल्याने आनंद वाटतो.

रिलायन्स रिटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी १३ हजार ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर आता सिल्वर लेकने पुन्हा १,८७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सिल्वर लेकची रिलायन्स रिटेलमधील भागीदारी १.७५ वरून २.१३ टक्के झाली आहे. अमेरिकेतील केकेआरची रिलायन्स रिटेलमध्ये १.२८ टक्के तर जनरल अटलांटिकची ०.८४ टक्के भागीदारी आहे.



हेही वाचा -

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मुबादला इन्व्हेस्टमेंटची ६,२४७.५ कोटींची गुतवणूक

रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा