Advertisement

कोरोना नुकसानग्रस्तांठी SBI ची खास योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोनामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना अतिरिक्त फंडिंग देण्याची योजना तयार केली आहे

कोरोना नुकसानग्रस्तांठी SBI ची खास योजना
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता लोकांसाठी संचारबंदी केली आहे. सर्वच ठिकाणी बंद असल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने अतिरिक्त फंडिंग देण्याची योजना तयार केली आहे. COVID-19 इमरजन्सी क्रेडिट लाइन प्लान (CECL) असं या योजनेचं नाव असून ही योजना 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेअंतर्गत कॅपिटल लिमिटच्या 10 टक्क्यांपर्यंत फंड लोन मिळणार आणि जास्तीत जास्त 200 कोटी रुपयांपर्यंत हे कर्ज मिळेल. CECL अंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी 7.25 टक्के व्याजदर असणार आहे. या कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग शूल्क अर्थात प्रीपेमेंट पेनल्टी आकारण्यात येणार नाही. एसबीआयप्रमाणेच इतर सरकारी आणि खाजगी बँका देखील व्यापाऱ्यांच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे झालेलं नुकसान या योजनेमुळे भरून काढण्यास मदत होईल. CECL एका डिमांड लोनच्या स्वरूपात असणार आहे, ज्याचा कालावधी 12 महिन्यांचा असेल. कर्ज काढल्यानंतर 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे कर्ज फेडावं लागेल.

या योजनेचा लाभ स्टँडर्ड खातं असणाऱ्या व्यापाऱ्यांना होणार आहे. ज्या व्यापाऱ्याचे 30 दिवसांचे आणि 16 मार्चपर्यंत ओव्हरड्यूज नाहीत, त्यांना याचा फायदा होणार आहे. ज्या कर्जदारांनी याआधी छोट्या व्यवहारांसाठी विशेष कर्जांचा फायदा घेतला आहे, ते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकतात.हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

Coronavirus Updates:मुंबईतील पेट्रोल पंप केवळ 'इतके' तास सुरू राहणारसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा