Advertisement

इतिहासात प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती शून्य डॉलरच्या खाली

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन आहे. जगभरातील व्यवहार ठप्प असून इंधनाची मागणीही प्रचंड घटली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी घट होत आहे.

इतिहासात प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती शून्य डॉलरच्या खाली
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन आहे. जगभरातील व्यवहार ठप्प असून इंधनाची मागणीही प्रचंड घटली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी घट होत आहे. मंगळवारी तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती घसरून  शून्य डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली उतरल्या होत्या. अमेरिकन कच्च्या तेलाने एवढा नीचांक गाठण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. 

अशावेळी भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा सर्वांना आहे. कारण इतिहासामध्ये पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किंमती एवढ्या खालच्या स्तरावर पोहोचल्या आहेत.  मंगळवारी अमेरिकन क्रूडचा भाव उणे ३७.६३ डॉलर प्रती बॅरल इतका खाली कोसळला. याचा अर्थ खनिज तेलाची साठवणूक करणे जिकरीचे बनल्याने विक्रेत्यांनी खरेदीदारांना प्रती बॅरल ३७.६३ डॉलर दिले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाने जगभरातील बाजारपेठा ठप्प आहेत. मागणीच कमी आहे. मात्र तेलाचा पुरवठा जास्त होत आहे. पुरवठा जास्त आणि मागणी कमी असल्याने मंगळवारी अमेरिकन क्रूड ऑइलचे फ्यूचर रेट पडून शून्य डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचले होते. 

कच्च्या तेलाचा भाव इतिहासात पहिल्यांदाच शून्याखाली गेला आहे. अचानक तेलाचा भाव शून्यखाली कोसळल्याने अमेरिका, रशियासह आखाती देशांमधील खनिज तेल उत्पादक देश चिंतेत आहेत. यापूर्वी दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ मध्ये कच्च्या तेलाच्या भावात इतकी मोठी घसरण झाली होती. तेलाच्या किमती शून्याखाली कशा गेल्या याबाबत तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून माहिती घेण्यात येणार आहे. अमेरिकी बाजारपेठेत खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. त्यामुळे तेलाची साठवण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.



हेही वाचा -

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा