Advertisement

मुंबईतले ‘हे’ १३ पूल प्रवासासाठी धोकादायक, पालिकेनं केलं आवाहन

रेल्वे मार्गावरून जाणारे आणि रेल्वे स्थानकांना जोणाऱ्या १३ धोकादायक पूलांची यादी जाहिर केली आहे. मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतले ‘हे’ १३ पूल प्रवासासाठी धोकादायक,  पालिकेनं केलं आवाहन
SHARES
मुंबई महापालिकेनं रेल्वे मार्गावरून जाणारे आणि रेल्वे स्थानकांना जोणाऱ्या १३ धोकादायक पुलांची यादी जाहिर केली आहे. मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने धोकादायक ठरवलेल्या पुलावरून प्रवास करत असालं, तर सावधान या पूलांवर भाविकांनी गर्दी करून प्रवास करू नये असे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांनी केलं आहे. 
हेही वाचाः-  पैशांसाठी तिने सख्या अल्पवयीन बहिणीला विकलं, मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार
मुंबईत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे यंदा गणपतीच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकीवर सरकारने पूर्णतहा बंदी घातली आहे.  मात्र तरीही घरगुती गणपतीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी आता वाढली आहे. अशातच पालिकेने रेल्वे मार्गावरून जाणारे आणि रेल्वे स्थानकांना जोणाऱ्या १३ धोकादायक पूलांची यादी जाहिर केली असून या पूलावर गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.  यात मध्य रेल्वेवरील ४, पश्चिम रेल्वेवरील ९ पूल हे धोकादायक असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यातील काही पुलांच्या दुरूस्तीची कामे पालिकेने हाती घेतली असून काही पुलांची दुरूस्ती प्रस्तावित आहेत.  प्रस्तावित पुलांची दुरूस्ती ही पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. 
हेही वाचा:- कोरोनाच्या काळात नाच-गाणे पडले महागात, ओशिवरात ९७ जणांवर कारवाई

या पुलावरून जाताना घ्या काळजी

मध्ये रेल्वेवर घाटकोपर उड्डाणपुल, चिंचपोकळी उड्डाणपुल, भायखळा उड्डाणपुल, करीरोड उड्डाणपुल हे धोकादायक ठरवण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील मरिनलाइन्स उड्डाणपुल, सॅण्डहर्स्ट रोड उड्डाणपुल, चर्नीरोड-ग्रॅन्ट रोड दरम्यानचा फ्रेंच उड्डाणपुल, केनेड उड्डाणपुल, ग्रॅन्टरोड-मुंबई सेंट्रल दरम्यानचा फाँकलंड उड्डाणपूल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील बेलासीस उड्डाणपुल, महालक्ष्मी स्टील उड्डाणपुल, प्रभादेवीचा कॅरोल उड्डाणपुल आणि दादरचा लोकमान्य टिळक उड्डाणपुल हे  रेल्वे मार्गावरील हे पुल अतिशय जुने आणि धोकादायक स्थितीत आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिर पोलिसांनी आगमन आणि विसर्जनावर जरी बंदी घातली असली. तरी  नागरिकांची  वर्दळ या धोकादायक पुलावरून सुरूच आहे. या पुलाला १६ टन पेक्षा जास्त वजन झेपणार नाही.  त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जनादरम्यान  या पुलावरून प्रवास करताना पोलिस आणि पालिकेने दिलेल्या सुचनेनुसार ये-जा ठेवावी. पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुढे जावे.  असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा