Advertisement

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार, १५ लाखांची इंजेक्शन जप्त

इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी या टोळीने ही इंजेक्शन दिल्लीहून आणल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार, १५ लाखांची इंजेक्शन जप्त
SHARES

कोरोना(Coronavirus pandemic)वर प्रभावी मानलं जाणारं टोकलिझुमब इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी या टोळीने ही इंजेक्शन दिल्लीहून आणल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आझम नासीर खान याला गुन्हे शाखा ९च्या पोलिसांनी अटक केली आहे.  

हेही वाचाः- Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

कोरोना संसर्गाचा मुंबईसह महाराष्ट्रात प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतांश रुग्णांमध्ये कोरोना झाल्यावर   आँक्सिजनची पातळी कमी होते. ती पातळी वाढवण्यासाठी टोकलिझुमब इंजेक्शन हे प्रभावी मानले जाते. मुंबईत या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. आरोपी वांद्रे रिक्लेमेशन येथे येणार असल्याची माहिती देसाई यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक आशा कोरके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाने आझम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याजवळून इंजेक्शनचे १५ नग छोटे बाँक्स ज्याची किंमत बाजारात १५ लाख इतकी  असून ते जप्त केले आहेत.

हेही वाचाः- आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

मूळचा उत्तराखंडचा राहणारा असलेला आझम नवीदिल्लीतील एका मेडिकल चालकाच्या मदतीने हे इंजेक्शन मुंबईत विक्रीसाठी आणत होता. किंमतीच्या तुलनेत दोन ते तीन पठीने विकत होता. म्हणजे प्रति नग १ लाखाने तो इंजेक्शन विकत होता. हे इंजेक्शन तो बेकायदेशीररित्या विना खरेदी बिलाने खरेदी करून ती अधिक किंमतीने विना विक्री बिलाने विकत असल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली आहे. त्याच्याजवळी औषध विक्रीसाठी लागणारा कोणताही परवाना नसल्याचे चौकशीत समोर आले आहे . आझमला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ आँगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा