Advertisement

मुंबईची जबाबदारी आता 'या' ७ आयपीएस अधिकाऱ्यांवर

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अलीकडेच ७ आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

मुंबईची जबाबदारी आता 'या' ७ आयपीएस अधिकाऱ्यांवर
SHARES

मुंबईत सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस संकटावर तोडगा काढण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अलीकडेच ७ आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते आपापल्या झोनमधील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतील.

प्रवीण परदेशी यांनी ७ मे २०२० रोजी परिपत्रक जारी केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, या अधिकाऱ्यांना दिलेलं उद्दिष्ट म्हणजे रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग १० दिवसांवरून २० दिवसांवर आणणं आहे. १० मे पर्यंत अधिकाऱ्यांना हे उद्दिष्ट गाठायचं आहे. कारण लॉकडाऊन १७ मे पर्यंत लागू करण्यात आला आहे. संबंधित झोनच्या परिस्थितीचा आढावा या अधिकाऱ्यांना घ्यायचा आहे आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महापालिका आयुक्तांकडे त्याचा अहवाल सादर करायचा आहे.

मुंबईतील  झोनमध्ये नियुक्त केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

विभाग
परिसरअधिकारी
विभाग १
कुलाबा, भायखळा, सीएसटी आणि मलबार हिल
ए. एल. जरहड
विभाग २
वरळी, धारावी, परळ, सायन
मनीषा म्हैसकर
विभाग ३
वांद्रे आणि सांताक्रूझ
एन. रामास्वामी
विभाग ४
अंधेरी, गोरेगाव
सुरेश काकाणी
विभाग ५
चेंबूर, कुर्ला
जयश्री भोज
विभाग ६
घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड
अश्विनी भिडे
विभाग ७
कांदिवली, बोरिवली, दहिसर
पी. वेलारसू


कोरोनव्हायरस रुग्णांच्या संख्येचं निरीक्षण करून राज्य सरकारनं 8 मे 2020 रोजी प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त सीएस म्हणून बदली करण्याचा निर्णय घेतला. यूडीडीचे प्रधान सचिव म्हणून काम करणारे इक्बाल चहल हे नवीन पालिका आयुक्त झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी मुंबई पालिका आयुक्ताचा पदभार स्विकारला.

शुक्रवारी झालेल्या बदल्यांमुळे ए.एल. जर्हाद आणि जयश्री भोज यांनाही जबाबदारी दिली जाणार नाही. त्यांचे पूर्वपद त्यांना सोपवले जाऊ शकते. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अहवालात असंही नमूद केलं आहे की, आयएएस अधिकाऱ्यांना आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि १० कलमी अजेंडावर कार्य करण्यासाठी स्वतःची रणनीती बनवावी लागेल. अजेंडामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्ट झोन तयार करणं, COVID 19 पॉझिटिव्ह केसेसची मॅपिंग करणे, डोअर-टू-डोअर सर्वेक्षण करणं, रोगनिदानविषयक रूग्णांची तपासणी करणं यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे सरकार आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करता येतील.

सध्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १० दिवसात दुप्पट होत आहे. ८  मे २०२० पर्यंत मुंबईत कोरोनाव्हायरसची संख्या १२ हजार १४२वर पोहोचली आहे. वरळी, वडाळा आणि धारावीसारख्या भागात दाटीवाटीच्या ठिकाणी अधिक रुग्ण वाढत आहेत. याशिवाय २ हजार ६४६ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ हजार ४९७ इमारती दाटीवाटीच्या परिसरात आहेत.



हेही वाचा

Coronavirus Update: महाराष्ट्रात २ लाखांहून जास्त कोविड-१९ चाचण्या

धक्कादायक! कोरोनाला कंटाळून सेव्हन हिल रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा