Advertisement

विषबाधा झालेल्या ८२ महिला कैद्यांची प्रकृती स्थिर

भायखळा जेलमधील महिला कैद्यांना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नाश्ता देण्यात आला होता. नाश्ता केल्यानंतर काही महिला कैद्यांना उल्टी, जुलाब होऊ लागल्या आणि पोटात मळमळू लागलं होते. जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

विषबाधा झालेल्या ८२ महिला कैद्यांची प्रकृती स्थिर
SHARES

विषबाधेमुळे जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भायखळा कारागृहातील ८२ महिला कैदी आणि ४ महिन्यांच्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नेमका प्रकार काय?

भायखळा जेलमधील महिला कैद्यांना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास पोहे देण्यात आले होते. नाश्ता केल्यानंतर काही महिला कैद्यांना उल्टी, जुलाब होऊ लागल्या आणि पोटात मळमळू लागलं. सकाळी ९.४० च्या दरम्यान या सर्व महिला कैद्यांना जे. जे. रुग्णालयात आणण्यात आलं. यामध्ये २ गर्भवती महिला आणि ४ महिन्यांच्या एका बाळाचा समावेश आहे. गर्भवती महिलांना महिला रोग विभागात, बाळाला बालरोग विभागात ठेवण्यात आलं आहे.अहवालाची प्रतिक्षा

जे. जे. रुग्णालयाचे औषधविभाग प्रमुख डॉ. विकार शेख यांनी सांगितलं की, कारागृहात सर्व कैद्यांना एकसारखं अन्न दिल जातं. त्यामध्ये डाळ, भात, पोळी, भाजी या अन्नपदार्थांचा समावेश आहे. या अन्नातून विषबाधा झाली की दूषित पाण्यातून हे वैद्यकीय अहवाल आल्यावरच कळेल. शीना बोरा हत्याकांडप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला मात्र विषबाधा झालेली नसून ती कारागृहातच असल्याची माहितीही डॉ. शेख यांनी दिली.

विषबाधा झालेल्या ८२ महिला कैद्यांवर डॉ. विद्या नागर यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. रुग्णालयातील ३५ निवासी डॉक्टर रुग्णसेवा पुरवत आहेत. सर्व महिला कैद्यांचं रक्त, लघवी, विष्ठा तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

भायखळा जेलच्या ८२ महिला कैद्यांना विषबाधा

२२ दिवसांच्या बाळाच्या शरीरात सुई, वाडियामध्ये यशस्वी शस्त्रक्रियाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा