Advertisement

केईएम रुग्णालयातही मृतदेहांच्या शेजारी रुग्णांवर उपचार

केईएम रुग्णालयातही मृतदेहांच्या शेजारी उपचार सुरू असल्याचा तो व्हिडीओ असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

केईएम रुग्णालयातही मृतदेहांच्या शेजारी रुग्णांवर उपचार
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयात मात्र मृतदेहांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध के.ई.एम रुग्णालयात ही घटना घडली असून, याबाबतचा व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. केईएम रुग्णालयातही मृतदेहांच्या शेजारी उपचार सुरू असल्याचा तो व्हिडीओ असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. सकाळच्या सुमारास केईएम रुग्णालयात घेण्यात आलेला हा व्हिडीओ असल्याचं राणे यांनी सांगितलं आहे. 'मुंबई महानगरपालिकेला आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा करायची नाही. मृतदेहांशेजारीच आपण उपचार घेण्याची सवय करून घ्यावी असं पालिकेला वाटत आहे', असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा - सायन रुग्णालयाच्या खिडकीतून कोरोनाग्रस्ताचा पळण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे यांनी सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ती घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एकदा त्यांनी केईएम रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.



हेही वाचा -

महापालिका रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी नेमके बेड किती?- नितेश राणे

Coronavirus Pandemic: राज्यभरात 1 हजारहून जास्त पोलिस कोरोना बाधित



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा