9 ऑगस्टला 2 लाख मुंबईकर राहणार उपाशी!

  Mumbai
  9 ऑगस्टला 2 लाख मुंबईकर राहणार उपाशी!
  मुंबई  -  

  मुंबईतले डबेवाले गेल्या 126 वर्षांपासून नागरिकांना वेळेवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. पण आजपर्यंत त्यांनी कधीही आपले काम बंद करून धरणे, आंदोलन, मोर्चा यामध्येही सहभाग घेतलेला नाही.

  पण 9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतील डबेवाले सहभागी होणार आहेत. मुंबईत मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला निघणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी वेळ प्रसंगी कामबंद करून सहभागी होण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला डबेवाल्यांकडून डबे घेणाऱ्या 2 लाख मुंबईकरांवर उपाशी रहाण्याची वेळ येणार आहे.

  डबेवाला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, उल्हास मुके, माजी अध्यक्ष यमनाजी घुले, सोपान मरे, बबनदादा वाळंज यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे डबेवाले मोर्चात सहभागी होतील.

  अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, स्वामिनाथन आयोग लागू करणे, चित्रपट नाटकांमधून मराठा समाजाची बदनामी थांबवणे, मराठा समाजासाठी ईबीसी सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाखांची करणे आणि मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करावे, यासाठी महाराष्ट्रात अनेकदा मोर्चा काढला गेला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार असल्याचे डबेवाला संघटनांनी स्पष्ट केले.  हेही वाचा -

  दक्षिण मुंबईतील कॉन्व्हेंट शाळांत डबेवाल्यांना बंदी

  'सेव्ह आरे'...मुंबईच्या डबेल्यांचीही हाक!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.