आयआयटी तपासणार कर्नाक पुलाचे आराखडे

कर्नाक पुलाच्या बांधकामाचा आराखडा बनवण्यासाठी टि.पी.एफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या तांत्रिक सल्लागाराची निवड करण्यात आल्यानंतर या आराखड्याची फेरतपासणी करण्यासाठी आता आयआयटीची निवड करण्यात आली आहे.

SHARE

मस्जिद बंदर येथील १४५ वर्षे जुना कर्नाक बंदर उड्डाणपूल धोकादायक ठरल्यामुळे रेल्वेच्या मदतीने तो तोडण्यात आला आहे. परंतु हा पूल तोडल्यानंतर मस्जिद बंदर पूर्व व पश्चिम बाजूचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिणामी स्थानिकांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या पुलाच्या बांधकामाचा आराखडा बनवण्यासाठी टि.पी.एफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या तांत्रिक सल्लागाराची निवड करण्यात आल्यानंतर या आराखड्याची फेरतपासणी करण्यासाठी आता आयआयटीची निवड करण्यात आली आहे.


कुणी बनवला आराखडा?

दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर येथील लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल वाहतुकीस धोकादायक झाल्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्याची सूचना मध्य रेल्वेने केली होती. त्यानुसार हा पूल तोडण्यात आला. हा पूल पाडण्याचा खर्च मुंबई महापालिकेने रेल्वेला दिलेला आहे. त्यानंतर या जागी उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाचा आराखडा महापालिकेने बनवला आहे.


१५ लाख रुपये मोबदला

पुलाचा आराखडा बनवण्यासाठी तसंच निविदेचा मसुदा बनवण्यासाठी महापालिकेने टि.पी.एफ इंजिनिअरींग कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक केली. या सल्लागाराने बनवलेला हा आराखड्याची फेरतपासणी करण्यासाठी आय.आय.टीची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी आयआयटीला १५ लाख रुपये दिले जाणार आहे.


किती लांबीचा पूल?

या पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. परंतु यासाठी पात्र ठरलेला कंत्राटदार काळ्या यादीतील असल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार हे कंत्राट रद्द करण्यात आलं होतं. या पुलाची एकूण १५० मीटर लांबी आणि २६.५ मीटर रुंदी असून या उड्डाणपुलाची पाच स्पॅनमध्ये उभारणी केली जाणार आहे. स्टील गर्डर, पी.एस.सी. गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅबचे बांधकाम केलं जाणार आहे.हेही वाचा-

आता महापालिकेत हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा श्रेयवाद!

हँकॉक पुलाचं काम लवकरच होणार सुरु, रेल्वे कंत्राटदारानं मारली बाजी!संबंधित विषय
ताज्या बातम्या