Advertisement

Live update - महाराष्ट्र पेटला, आंदोलनाची इत्थंभूत माहिती

बुधवारी सकाळी मुंबईसह राज्यभरात बंदला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात वाजेपर्यंत मुंबईत सर्वत्र शांतता होती. त्यानंतर मात्र आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू लागले. ठाण्यात साडे सातच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकावरील ट्रँकवर आंदोलक उतरले आणि त्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरला. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला.

Live update - महाराष्ट्र पेटला, आंदोलनाची इत्थंभूत माहिती
SHARES

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी मुंबईसह राज्यभरात बंदला सुरूवात झाली. सकाळी साडे सात वाजेपर्यंत मुंबईत सर्वत्र शांतता होती. त्यानंतर मात्र आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू लागले. ठाण्यात साडे सातच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर आंदोलक उतरले आणि त्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरला. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला. तर तीन हात नाका परिसरातही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला.

हेही वाचा - भीमा-कोरेगाव हिंसाचार: दुपारी बंदची धग वाढली

हेही वाचा - जाणून घ्या, भीमा-कोरेगावच्या शौर्याचा इतिहास

६.२६ - आतापर्यंत १५० जणांवर गुन्हे दाखल

५.५६ - रेल्वे पोलीस तोडफोडीचे गुन्हे दाखल करणार

५.४१ - संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या हिंसाचाराचा तपास केला जाईल, त्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५.३१ - वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वे वरील वाहतूक सुरळीत सुरू

५.०८ - आंदोलनादरम्यान एकूण ५२ बसेस फोडल्या

५.०१ - घाटकोपर ते वर्सोवापर्यंतची मेट्रो वाहतूक तब्बल ५ तासानंतर सुरू

४.५९ -

४.५८ -

४.५६ - 


४.५३ -


४.५१ - मेट्रो अजूनही ठप्प, संध्याकाळी ५ किंवा ५.३० नंतर सुरू होण्याची शक्यता 

४.४६ - इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अजूनही ट्रॅफिक जाम

४.४४ - आंदोलनकर्त्यांनी संप मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वे वाहतूक सुरू

४.२३ - आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवू शकतो अशा काही संशयास्पद संघटनांची नावं आम्ही पोलिसांना दिली होती. या संघटनांवर कारवाई न झाल्यास पूर्ण जबाबदारी ही पोलिसांची असेल आणि या संघटनांची नावं आम्ही जाहीर करू असं पोलिसांना सांगताच त्यांनी त्वरीत कारवाईला सुरुवात केली त्यामुळे मुंबईत फार हिंसाचाराच्या घटना झाल्या नाहीत - प्रकाश आंबेडकर

४.१९ - आजचा बंद शांततेत पार पडला - प्रकाश आंबेडकर

४.१६ - न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे - प्रकाश आंबेडकर

४.१४ - हे आंदोलन फक्त दलित बांधवांचं नाही - प्रकाश आंबेडकर

४.१२ - आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे 

४.१० - जो न्या याकूब मेमनला तोच न्याय संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना लावा - प्रकाश आंबेडकर

४.०९ - काही हिंदू संघटना अराजकता माजवत आहेत - प्रकाश आंबेडकर

४.०८ - महाराष्ट्र बंदच्या पाश्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरू

४.०० - महाराष्ट्र बंदचे मुंबईत पडसाद 




३.४८ - परळमधील आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ 

३.४१ - आंदोलनादरम्यान मुंलुंडमध्ये मोकळ्या रस्त्यावर तरुण क्रिकेटची लुटतायत मजा  

हेही वाचा - भीमा-कोरेगाव हिंसाचार: दुपारी बंदची धग वाढली

३.३९ - 

३.३२ - महाराष्ट्रातील जनेतेने संयम बाळगावा, सोशल मीडियातून चुकीचे संदेश पोहचवले जात आहेत, काँग्रेसचे सर्व आरोप चुकीचे दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

३.१६ - सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईकरांशी सहकार्य करा, आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत मागे घेण्यात येईल - आनंदराज आंबेडकर 

३.०९ - आरसीटी मॉलसमोर गाड्यांची जाळपोळ, आंदोलकांनी अनेक गाड्या जाळल्या 

३.०५ - आंदोलनादरम्यान मुलुंडमध्ये आंदोलकांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिली


२.५३ - चेंबूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या

२.४८ - रमाबाई कॉलनीतील वातावरण

२.४४ - चेंबूरमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक, बेस्ट बसेस जाळल्या

२.२८ - दुपारी १ वाजेपर्यंत ४८ बसेसची तोडफोड, चार वाहनचालक काचा लागून जखमी


२.२५ - विक्रोळी स्टेशन ते आरसीटी मॉल परिसरात अनेक वाहनांची तोडफोड, आंदोलनकर्त्यांनी अनेक गाड्या जाळल्या

२.२३ - डोंबिवली रेल्वे स्टेशनमधील तिकीट घराची तोडफोड


२.२२ -

२.१९ - इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाच किलोमिटरपर्यंत वाहनांची लांब रांग

२.१७ - विक्रोळी एलबीएस मार्गावर चारचाकी वाहन जाळली

२.१६ - गोरेगावमध्ये लोकल ट्रेन रोखली

२.१५ - कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर आंदोलकांची तोडफोड, खुर्च्या, लाईट पिण्याच्या पाण्याच्या मशिनीची तोडफोड


हेही वाचा - शहरातील ९ पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल


२.१४ - विरारमधील आंदोलन

२.११ - वरळीतील आंदोलन

२.०८ -

२.०७ - संध्याकाळी ५ नंतर आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर

२.०६ - मरोळमधील मेट्रो स्टेशन बंद

२.०५ -

२.०३ - पवई तुंगा ते अंधेरी एमआयडीसीपर्यंतचा रस्ता जाम  

१.५९ - तीन वाजता होणाऱ्या परीक्षेसंदर्भात मुंबई विद्यापीठाने नवीन सूचना केली जारी

१.५७ - 

हेही वाचा - आरोपींवर याकूब मेमनसारखा हत्येचा गुन्हा नोंदवा - अॅड. प्रकाश आंबेडकर

१.५६ - एसी लोकलच्या आठ फेऱ्या रद्द

१.५४ - जोगेश्वरी-विक्रोळी रोडवरील वाहतूक सुरू

१.५१ - हार्बर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू

१.५१ - कुर्ला पूर्व येथे बंद शांततेत सुरू, आंदोलनकर्ते रस्त्यावर 

१.४९ - ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षा देता येणार नाही त्यांची परीक्षा मुंबई विद्यापीठ नंतर घेणार

१.४७ - आंदोलनकर्त्यांनी डोंबिवलीमध्ये तिकीट घर फोडलं

१.४६ - मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडल्या - मुंबई विद्यापीठाचा दावा 

१.४५ - आंदोलनामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

१.३९ - गोरेगावमध्ये ऑबेरॉय मॉलजवळ रास्ता रोको

१.३७ - घाटकोपरमध्ये आंदोलनकर्त्यांनी गाड्या अडवल्या

१.३५ - डोंबिवली, घाटकोपर, वरळीत आंदोलन सुरू, लोकल, एक्स्प्रेस आंदोलनकर्त्यांनी रोखून धरल्या

१.३३ - आयआयटी पवई येथील मोर्चा मागे घेतला

१.२९ - दहिसर चेकनाक्यावरील आंदोलन संपलं, वाहतूक सुरळीत

१.२२ - मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये तणावपूर्ण वातावरणामुळे विमान तिकीटाचे कॅन्सलेशन चार्जेस रद्द केले 



१.१८ -

१.१६ - 


 


१.१२ - पश्चिम रेल्वेवर मार्गावरील दादर, गोरेगाव, एल्फिन्स्टन रोड, मालाड वाहतूक विस्कळीत

१.१० - घाटकोपरच्या पंथनगर येथे वाहतूक कोंडी, आंदोलनकर्त्यांकडून गाड्यांची अडवणूक

१.०८ - लोअर परळमध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षक पठाण आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची

१२.५३ - घाटकोपर मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन बंद - एमओपीएलची माहिती

१२.५२ - पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीतून वरळी नाका काही तासांसाठी केला बंद

१२.५० - घाटकोपरमध्ये आंदोलकांनी टायर जाळली

१२.४८ - दादरमध्ये प्लॅटफॉर्म ६ आणि ७ वर आंदोलन सुरू, हाय-वेवरील वाहतूक रोखली, ट्रॅकवर उतरून आंदोलन आंदोलकांचं आंदोलन सुरू


१२.४४ - ठाण्यात प्रवासी बस पेटवली, आक्रमक आंदोलकांकडून जाळपोळ

१२.४२ - दादर रेल्वे स्थानकात आंदोलनकर्ते आक्रमक, ट्रॅकवर उतरून आंदोलन

१२.३२ - विरारमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक 



१२.३० - कांदिवलीत महावीरनगरमध्ये आंदोलनकर्त्यांनी दुकानं बंद केली


१२.२९ - वांद्र्यात लकी हॉटेलसमोर आंदोलनकर्त्यांचा रास्ता रोको

१२.२८ -

१२.२४ - जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत हलणार नाही - आंदोलनकर्त्यांची कठोर भूमिका


१२.२३ - रमाबाई नगर येथे बेस्ट बस पुन्हा डेपोत पाठवली

१२.२१ - वरळी नाक्यावर आंदोलनकर्त्यांनी बस अडवली

१२.१८ - मुंबईत ट्रॅफिक जाम, रेल्वे वाहतूक विस्कळीत


अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस

बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली नसली तरी मुंबईतील अनेक शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर रात्री उशिरा मुंबईतील डबेवाल्यांनी बंदला पाठिंबा देत डबा सेवा बंद ठेवल्याचे जाहीर केलं आहे. तर सकाळपासून बेस्टची वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा - भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंत्रालयात


ठाण्यात तणावाचं वातावरण

ठाण्यात एसटीने बंदला पाठिंबा दिला आहे. तर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आला. दरम्यान २ ते ४ जानेवारीपर्यंत ठाण्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. शास्त्रीनगरमध्ये एका तरुणाने रिक्षावर दगडफेक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं आहे. तीन हात नाक्यावरही जमावाने दगडफेक करत टीएमटीच्या बसेस फोडल्या. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी रिक्षाही अडवल्या. त्यामुळे ठाण्यातील वातावरण सकाळपासून तणाव निर्माण झाला आहे.

१२.१२ - मेट्रोच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

१२.१२ -  भिमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद मुंबईत, आंदोलनकर्ते उतरले रस्त्यावर


१२.०८ - भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मुंबई लाइव्हवर

१२.०१ - इस्टर्न एक्प्रेस हाय-वे बंद, रमाबाई नगर येथे आंदोलकर्ते उतरले रस्त्यावर

१२.०० - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आजच होणार, विद्यार्थ्यांना एक तास उशिरा येण्याची मुभा

११.५३ - हार्बर, मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

११.५१ - एअरपोर्ट रोड ते वर्सोवादरम्यान मेट्रो वाहतूक सुरू

११.५० - अंधेरीत इन्फिनिटी मॉलसमोर आंदोलनकर्ते जमले, सिग्नल रोखून धरला

११.४८ - मुंबई लाइव्ह एक्सक्लुझिव्ह- आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेना 

'भीमा कोरेगावमध्ये अजूनही हिंसाचार जाळपोळ सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब या हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक करा अशी आमची मागणी आहे. मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व जनतेला आवाहन आहे की, त्यांनी शांततेत आंदोलन करावं' - आनंदराज आंबेडकर

११.४० -

११.३७ - दहिसर चेक नाक्याजवळ वाहतूक कोंडी


११.३६ -

११.३४ - घाटकोपर ते एअरपोर्ट दरम्यान मेट्रो वाहतूक बंद

११.१७ - 


११.१६ -

११.१५ -


११.१३ - वांद्र्यातील कलानगर जंक्शन येथे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून केला विरोध


११.११ - एसी लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द, पवईच्या आयआयटी बॉम्बेजवळ वाहतूक कोंडी

११.१० - आंदोलनकर्त्यांनी मुंबईतील एकूण १३ बेस्टच्या बसेस फोडल्या

११.०८ - राज्य भरातील शासकीय कॉम्युटर टायपिंग परीक्षा रद्द, रद्द झालेली परीक्षा रविवारी घेण्यात येईल

११.०७ -

११.०६ - 

११.०४ - वांद्र्यात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे पूर्णपणे जाम

११.०३ - वडाळ्यातील बरकत अली रोड बंद करण्यात आला

११ - कलानगर येथील एमआयडीसीत वाहतूक कोंडी

१०.५८ - चेंबूरमध्ये तणावाचं वातावरण

१०.५४ - घाटकोपरमधील भटवाडी येथे बेस्टची बस फोडली

१०.४९ - कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका - मुंबई पोलिसांचं आवाहन

१०.४६ - वरळी नाका आणि सिद्धार्थनगरमध्ये आंदोलकांचा रास्तारोको आणि दगडफेक, बस आणि टॅक्सीची अडवणूक

१०.४५ - 


 


१०.३६ - वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलकांची गर्दी, प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न

१०.३५ - कलानगर जंक्शन वांद्रे, घाटकोपरमधील बर्वेनगर, वाकोला पाईपलाईन येथे रास्ता रोको

१०.३३ - वांद्र्यातील सद्यस्थिती

१०.३२ - तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवलीत रिक्षा बंद

१०.३० -

१०.२६ - पीएन लोखंडे मार्ग, दिंडोशी मार्ग, जिजामातानगर वरळी, तुळशेटपाडा, वांद्रे वसाहत, संघर्षनगर चांदिवली, खैराणी रोड साकीवाका, आखुर्ली या मार्गावरील बेस्ट धावण्यास अडथळा, चेंबूरमध्ये बेस्ट फोडली

१०.२५ - २ ते ४ जानेवारीपर्यंत ठाण्यात जमावबंदीचे आदेश, ४ जानेवारीला रात्री १२ पर्यंत जमावबंदी

१०.२३ - २९४५ बसपैकी २६४५ बस रस्त्यावर

१०.२१ - पश्चिम रेल्वेवरील वाहतूक २०-३० मिनिटे उशिरा

१०.१९ - शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती

१०.१७ - विरारकडे येणाऱ्या लोकल गाड्या बंद, आंदोलकांनी मार्ग रोखून धरला

१०.१६ - कल्याण आणि अंबरनाथमध्ये रिक्षा सेवा बंद

१०.०४ - मुलुंड चेक नाका येथे वाहतूककोंडी

१०-०३ - ठाण्यात आंदोलकांनी टॅक्सी रिक्षांच्या टायरची हवा सोडली

१०.०१ - कांदिवली ते आकुर्ली, दिंडोशी ते हनुमाननगर, कांदिवली ते संतोषनगर, खैराणी रोड ते साकी नागा, सहार कार्गो ते मुलुंड चेकनाका आणि जिजामाता नगर या मार्गावर बेस्ट बसची सेवा बंद 

९.५७ - मुंबईतील बहुतांश कॉलेज सुरू आहेत. मात्र बऱ्याच कॉलेजमध्ये बारावीच्या पूर्व परीक्षा होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज कॉलेज नियमिती सुरू असल्याची प्राचार्यांची माहिती. 

९.५१ - अंधेरीत शालेय बस आणि विद्यार्थ्यांना घेऊन येणारी खासगी वाहने संपात उतल्याने हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि इतर शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक वर्गांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली  

९.४८ -

९ .४५ - कांदिवलीतल्या जनकल्याणनगर येथे रिक्षा-टॅक्सीची अडवणूक


९.४३ -

९.३७ - 


९.३६ - विरार गोरेगावमध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत

९.३४ - 

९.३३ - अटक झालेल्या १०० जणांपैकी ९ जणांवर गुन्हे दाखल

९.३० - चेंबूरमध्ये खासगी स्कूल बस फोडली 

९.२० - प्रकाश आंबेडकर यांची आज महाराष्ट्र बंदची हाक

९.१० - बऱ्याच ठिकाणी रिक्षा टॅक्सी सुरू

९.०४ - कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका - मुंबई पोलीस

८.५० - मुंबईत रेल्वे वाहतूक सुरळीत

८.४४- गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाममध्ये रास्ता रोको आंदोलन, पोलीस घटनास्थळी दाखल

८.३०- ठाण्यात रेल रोको आंदोलन, रेल्वे वाहतूक सुरळीत

८.०५ - शाळा-कॉलेजांना बुधवारी सुट्टी नाही. सर्व कामकाज नियमित सुरु राहणार

७.५८ - वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर लोकल वाहतूक सुरळीत, हार्बरवर गाड्या उशीराने 

७.२४ - एलबीएस मार्गावर काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही काही ठिकाणी ट्रॅफिक

६.१० - भारिपच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला राज्यातल्या २५०हून अधिक डाव्या आणि पुरोगामी संघटनांचा पाठिंबा

६.०० - मंत्रालयात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

५.३० - मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

५.४२ - लांब पल्ल्याच्या उपनगरीय लोकल सुरळीत सुरु - पश्चिम रेल्वे

५.४० - मुंबईत घडलेल्या विविध हिंसक घटनांमध्ये तब्बल १०० जणांना अटक - मुंबई पीआरओ

५.३० - मुंबईत घडेलेल्या जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांना आधीच घरी जाण्याची परवानगी

५.१२ - हार्बर लाईनवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

५.०० - भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा न्यायालयीन चौकशीचा निर्णय, तसेच युवकाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार, मृताच्या नातेवाईकांना१० लाखांची मदत 

४.३० - हिंदू एकता मंचाचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुण्यातल्या पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

४.०० - २० बेस्ट आणि १३४ एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

३.३५ - भीमा-कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी दिली बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक






भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो अनुयायी १ जानेवारीला जमले होते. सकाळी ८-९ वाजेच्या सुमारास भीमा-कोरेगावनजीकच्या वढु बुद्रुक येथे दोन गटांमध्ये वादावादी झाली, त्यातून पुढे दगडफेक आणि मग जाळपोळीसारख्या घटना घडल्या नि भीमा-कोरेगाव, वढु बुद्रुक, शिक्रापूर, पेरणफाटा परिसरात तणाव निर्माण झाला. या जाळपोळीत एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद मंगळवारपासून मुंबईतील विविध ठिकाणी उमटू लागले आहेत.



या घटनेचा आंबेडकरी अनुयायी, संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर अशा ठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणची दुकाने बंद करत आहेत. चेंबूरच्या अमर महल येथे रास्ता रोको करण्यात आला असून काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडल्याचं समजत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या या आंदोलनामुळे इस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मंगळवारी दिले आहेत. तर या घटनेत मृत झालेल्या तरूणाच्या नातेवाईकाला १० लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा