Advertisement

सांभाळून राहा! मुंबईत १ लाख कुत्री नसबंदीविनाच!!


सांभाळून राहा! मुंबईत १ लाख कुत्री नसबंदीविनाच!!
SHARES

मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची (निर्बिजीकरण) मोहीम महापालिकेने हाती घेतली असून जवळपास सर्वच कुत्र्यांची नसबंदी झाल्याचा दावा महापालिका करत आहे. मात्र अजूनही मुंबईतील १ लाख कुत्र्यांची नसबंदी शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी केलेल्या मोजणीत मुंबईत ९५ हजार भटकी कुत्री आढळली होती. या तीन वर्षांत सुमारे २५ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. तरीही प्रशासन अजूनही १ लाख कुत्र्यांची नसबंदी करायची असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे नसबंदीच्या या मोहिमेचे शेपूट कधी सरळ होणार? असा प्रश्न पडला आहे.


२० वर्षांत पावणे तीन लाख कुत्र्यांची नसबंदी

श्वान नियंत्रण विभागाने १९९४ पासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रम (एबीसी प्रोग्रॅम) राबवला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९९८ पासून अशासकीय संस्थांच्या सहभागातून हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला. ऑक्टोबर १९९८ ते ३१ मार्च २०११ या १३ वर्षांच्या कालावधीत २ लाख ३० हजार ४३४ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या १३ वर्षांत ६ कोटी ४६ लाख ७४ हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला. परंतु त्यानंतर २०११ ते मार्च २०१७ पर्यंत ५ वर्षांच्या कालावधीत केवळ ५० हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली.


३ वर्षांत १ लाख २ हजार कुत्र्यांची नसबंदी अपेक्षित

जानेवारी २०१४ मध्ये महापालिकेने केलेल्या गणनेत कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७२ एवढी होती. त्यातील २५ हजार ९३३ कुत्र्यांची नसंबदी झाल्याचा दावा महापालिकेने केला. मात्र कुत्र्यांच्या प्रजननाचा विचार करता मुंबईत १ लाख भटके कुत्रे अस्तित्वात असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी ६ संस्थांना दिलेल्या कंत्राटाची मुदत वाढवण्यात येणार आहे. येत्या ३ वर्षांत १ लाख २ हजार ३७९ भटक्या कुत्र्यांची नसबंदी अपेक्षित असून त्यासाठी ८ कोटी ६१ लाख १२ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


कुत्र्यांच्या नसबंदीवर १८ कोटींचा खर्च

कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम १९९८ मध्ये हाती घेण्यात आली असून त्यानंतर २०११ मध्ये २ वर्षांसाठी, तर २०१३ मध्ये ५ वर्षांसाठी आणि आता पुन्हा पुढील ३ वर्षांसाठी या कंत्राटाला मुदतवाढ देण्यात येणार आहे. पहिल्या २० वर्षांत १० कोटी रुपये कुत्र्यांच्या नसबंदीवर खर्च करण्यात आला आहे. आता आणखी ८ कोटी ६१ लाख १२ हजार रुपयांनी वाढ करून दिली जात आहे. त्यामुळे २२ वर्षात या कुत्र्यांच्या नसबंदीवर १८ कोटी रुपये खर्च केले जात आहे.


नसबंदीसाठी नेमलेल्या संस्था आणि ठिकाण

  • वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज:  महालक्ष्मी
  • बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेशन ऑफ क्रूएल्टी टू अॅनिमल: परळ
  • इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स: देवनार
  • अहिंसा: मालाड
  • उत्कर्ष स्टार मित्र मंडळ: मुलुंड
  • युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी: मालाड



हेही वाचा 

...असा झाला पारूलवर हल्ला

'मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा