बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!

Mumbai
बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!
बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!
बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!
बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!
See all
मुंबई  -  

रेड एफएमची आरजे मलिष्कानं मुंबईकरांच्या महापालिकेवरच्या ‘भरोसा’ला तडा दिल्यानंतर आता सर्वच स्तरातून मलिष्काला पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असे विरोधक तर मलिष्का प्रकरणावरुन शिवसेनेला टार्गेट करत आहेतच, मात्र यांच्याबरोबरच सत्तेत जनतेच्या भरवशावरच सोबत बसलेल्या भाजपनेही शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. 

मलिष्काचं ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?’ हे गाणं व्हायरल झाल्यानंतर पालिकेला मलिष्काच्या घरी डेंग्युच्या अळ्या सापडल्याचा शोध लागला आणि त्याबाबत तिला रीतसर नोटीसही पाठवली गेली. शिवाय शिवसेनेकडून मलिष्कावर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावाही ठोकण्याची मागणी केली जाऊ लागली. यामुळे आधीच सॉफ्ट टार्गेट ठरलेली मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना अजूनच बॅकफूटवर गेली. पालिकेने सूड भावनेने मलिष्काला नोटीस पाठवली अशी चर्चा सुरु झाली. आणि मुंबईतल्या रस्त्यांसोबतच सोशल नेटवर्किंग साईटवर शिवसेनेला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर विनोद करणारे अनेक मेसेजेस व्हॉट्सअॅपवर व्हायरल होऊ लागले आहेत...फेसबुकवरही शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे...


एका फेसबुकीनं तर थेट मलिष्काच्या गाण्यावरुन इंग्रजीमध्ये आणखी एक गाणंच तयार करुन टाकलं आहे!


मलिष्काच्या गाण्यानंतर मुंबईकरांनी खड्ड्यांचे पुरावे द्यायला सुरुवात केली आहे...


दरम्यान, एका मुंबईकराने अंधेरी भागामध्ये पाणी साचल्यामुळे तयार झालेल्या तळ्याचा व्हिडिओच ट्विट केला आहे...

काहींनी तर लोकांना बीएमसीविरुद्ध काहीही न बोलण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर घरी डेंग्युच्या अळ्या सापडतील म्हणे!


काही ट्विटरकरांनी मलिष्कावर 500 कोटींचा दावा ठोकण्याची मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेवरच आपली जबाबदारी पार न पाडल्याप्रकरणी दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे!

शिवसेनेकडून मलिष्काला प्रत्युत्तर देण्यासाठी बनवण्यात आलेल्या गाण्याचीही नेटिझन्सनी खिल्ली उडवली आहे...

मलिष्काच्या गाण्यातल्या चुका काढण्यापेक्षा आपले ‘सैनिक’ रस्त्यांवर उतरवून शिवसेना खड्डे भरण्याचं काम का करत नाही? असाही सवाल एका ट्विटमध्ये विचारण्यात आला आहे...

मलिष्काला जर मुंबईतल्या समस्या दाखवल्यामुळे त्रास दिला जात असेल, तर मुंबईतील नगरसेवकांनाही काम न केल्याबद्दल शिक्षा व्हायला हवी अशी मागणी एका ट्विटरकराने केली आहे


सामान्य मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडल्यामुळे मलिष्काला सोशल साईट्सवर, राजकीय पटलावर आणि सामान्य जनतेकडून थेट आणि भरपूर पाठिंबा मिळत आहे. मात्र नेमकं त्याच वेळी शिवसेनेने आणि सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने मलिष्काला घरी डेंग्युच्या अळ्या सापडल्या म्हणून नोटीस पाठवली. शिवाय मलिष्काने केलेल्या गाण्याबद्दल तब्बल 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही दिला. यामुळे मुंबईकरांच मत आपल्या समस्या मांडणाऱ्या मलिष्काच्या बाजूने झुकणं साहजिक होतं. झालंही तसंच! आता हे मलिष्का आणि सोनुच्या भरवश्याचं प्रकरण शिवसेनेला कधीपर्यंत झोंबतंय, हा खरा औत्सुक्याचा विषय आहे.हेही वाचा

डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!

तमाशा पुरे, प्रश्न सोडवा!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.