महिला तस्करी रोखा, एका कॉलवर

 Mumbai
महिला तस्करी रोखा, एका कॉलवर
महिला तस्करी रोखा, एका कॉलवर
See all
Mumbai  -  

महिला तस्करीत देशामध्ये कोलकत्यापाठोपाठ मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाने जाहीर करताच देशभर खळबळ उडाली. त्यामुळे महिला तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान सरकार, पोलिसांसह राज्य महिला आयोगासमोरही उभे ठाकले आहे

हे आव्हान पेलण्यासाठी राज्य महिला आयोग पुढे सरसावले आहे. त्यानुसार केवळ महिला तस्करीच नव्हे, तर कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळासह कुठल्याही अत्याचाराला रोखण्यासाठी आयोगाने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे

या हेल्पलाईन अंतर्गत एका काॅलवर पीडीत महिलांची तक्रार  नोंदवून त्यांना आवश्यक ती मदत तात्काळ देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनाद्वारे त्यांना मानसिक बळ देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर पुढे न्यायालयीन लढ्यासाठी लागणारी कायदेशीर मदतही आयोगाकडून केली जाणार आहे हे विशेष.


क्रमांक १०४


महिलांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची १०४ क्रमांकाची हेल्पलाईन सेवा आहे. मात्र या हेल्पलाईनवर मानसिक आरोग्यासंदर्भात समुपदेशन केले जाते. पण आता आयोगाच्या या हेल्पलाईनवर महिलांना कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि महिला तस्कारीसंदर्भात समुपदेशन केले जाणार आहेतक्रार नोंदवताच महिलांना तात्काळ मदत दिली जाणार आहे. जसे की पोलिस यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेकडून लागणाऱ्या मदतीचा यात समावेश असेल. त्यासाठी प्रत्येक राज्यातील पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेचा डेटा आयोग गोळा करणार असून तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत पीडीत महिलेला आवश्यक ती मदत केली जाणार आहे

तर हेल्पलाईन हाताळणाऱ्या व्यक्ती या प्रशिक्षित समुपदेशक असल्याने त्यांच्याकडून तक्रारदार वा पीडीत महिलेचे समुपदेशन केले जाणार असल्याने ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ज्यामुळे पीडीत महिलेला योग्य ते मार्गदर्शन मिळेल.

ही स्वतंत्र हेल्पलाईन तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू असून त्यासाठी दोन प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्तीही आयोगाकडून करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा क्रमांकही लवकरच निश्चित करण्यात येणार आहे

सध्या तरी ही हेल्पलाईन कार्यालयीन वेळेत अर्थात १० ते ६ या वेळेतच कार्यरत रहाणार आहे. ही सेवा २४ तास देण्यासंबंधीचा निर्णय पुढे घेण्यात येईल, असेही रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही हेल्पलाईन कार्यन्वित झाल्यास ही देशातील पहिली अशी हेल्पलाईन असेल, असा दावाही रहाटकर यांनी केला आहे.


अनेकदा महिला अत्याचाराविरोधात आवाज न उठवता अत्याचार सहन करतात. इतकेच नव्हे तर नैराश्याखाली जात आत्महत्यासारख्या निर्णयापर्यंत पोहोचत असल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा महिलांना आम्हाला हेच सांगायचे आहे की कायदा तुमच्या पाठिशी आहे, यंत्रणा तुमच्या पाठिशी आहे, तुम्ही फक्त एक काॅल करत पुढे या.

- विजया रहाटकर, अध्यक्षा,राज्य महिला आयोगहे देखील वाचा - 

अॅसिड हल्ल्यातल्या तरुणींचा 'कॉन्फिडन्स वॉक'


Loading Comments