Advertisement

हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर

लसीकरण शिबिरात नागरिकांना लस देण्यात आली की आणखी काही, याबद्दलची माहिती घेण्यासाठी मुंबई महापालिकेनं सीरम इन्स्टीट्यूटकडे माहिती मागितली होती.

हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर
SHARES

कांदिवलीतील (Kandivli) हिरानंदांनी हाऊसिंग (Hiranandani Housing society) सोसायटीमधील रहिवाशांना देण्यात आलेली लस खरी आहे, अशी माहिती पालिका (BMC) अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला दिली आहे. याशिवाय हिरानंदानी सोसायटीतील शिबिरासाठी वापरण्यात आलेले लसींचे डोस गुजरातमधील दमण आणि दीव येथे पाठवले जाणार होते, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे.

कांदिवलीतील हिरानंदानी हाऊसिंग सोसायटीमध्ये लसीकरण शिबीर घेण्यात आलं होतं. मात्र, कोविशिल्ड लस घेतल्यानंतर नागरिकांना कोणताही मेसेज आला नाही. तसेच लक्षणंही दिसली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर हा लसीकरण घोटाळा समोर आला होता.

लसीकरण शिबिरात नागरिकांना लस देण्यात आली की आणखी काही, याबद्दलची माहिती घेण्यासाठी मुंबई महापालिकेनं सीरम इन्स्टीट्यूटकडे माहिती मागितली होती. शिबिरात वापरण्यात आलेल्या लसी इन्स्टिट्यूटकडून कोणत्या रुग्णालयाला देण्यात आल्या होत्या, अशी विचारणाही महापालिकेनं केलेली होती.

यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटनं महापालिकेला माहिती दिली आहे. शिबिरासाठी वापरण्यात आलेल्या लसी गुजरातमधील दमण आणि दीवला पाठवल्या जाणार होत्या, अशी माहिती आता समोर आली आहे. मुंबई महापालिकेनं ही माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.

“जर लसीचे डोस एखाद्या रुग्णालयाला देण्यात आलेले असेल, आणि त्या रुग्णालयानं हे डोस हिरानंदानी सोसायटीतील शिबिरासाठी दिलं का याची चौकशी केली जाईल. हे जर झालं नाही, तर आरोपींना लसीचे डोस कसे मिळालेत याचा तपास पोलीस करतील,” महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

“लसींचा काळाबाजार होत असल्याची बाब नाकारता येऊ शकत नाही. लसीकरण केंद्रांवरून या लसी शिबिरांसाठी वळवण्यात आल्या होत्या, याची चौकशी करत आहोत. जर लसीचे डोस बाहेर राज्यातून आणण्यात आले असतील, तर त्या शहरात कशा पद्धतीनं पुरवण्यात आल्या, याची माहितीही घेण्याची गरज आहे,” असं पालिका अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान मुंबईत बनावट लसीकरण शिबीराच्या माध्यमातीन दोन हजारांपेक्षा अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आह, अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिली आहे. करोनाची लस मिळण्यामध्ये लोकांना होणाऱ्या अडचणींसंबंधी दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात लोक लसीकरण घोटाळ्याला बळी पडले असल्याची दखल घेत हायकोर्टाने म्हटलं की, “त्या लोकांची नेमकी काय स्थिती आहे याची आम्हाला चिंता आहे. त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. बनावट लसीचे काही दुष्परिणाम जाणवत आहेत का? याची माहिती घ्या. त्यांच्या शरिरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत का? त्यांना सलाईन किंवा इतर काही दिलं असेल तर काय?”.



हेही वाचा

“महाराष्ट्रातील ‘या’ ७ जिल्हातील परिस्थिती होऊ शकते चिंताजनक”

घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, अजून डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा