आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली ७८ जणांची फसवणूक

सुरूवातीचे काही दिवस पैसे मिळाले, पण त्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून शहा यांना गुंतवणूकीवर कोणतेही व्याज अथवा मुद्दल रक्कम मिळाली नाही.

आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली ७८ जणांची फसवणूक
SHARES

गुंतवणूकीवर दरमहा आकर्षक गुंतवणूक देण्याचे आमीष दाखवून ७८ जणांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची रक्कम सुमारे १२ कोटी रुपये असून १ जानेवारी,२०१८ पासून व्याज मिळाले नसल्याचे तक्राररीत म्हटले आहे.

हेही वाचाः- डोंगरीच्या बालसुधारगृहात कोरोनाची ‘इंट्री’

 गोरेगाव परिसरात राहणारे तक्रारदार राजेश शहा(४५) हे एका खासगी बँकेत उच्च पदावर काम करतात. माटुंगा येथील एका पार्टनरशिप फर्म दर महा १ ते १.०५ टक्क्यांनी गुंतवणूक स्वीकारत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ऑक्टोबर २०१६ मध्ये ते या कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयालात गेले होते. त्यावेळी तेथेही १ ते १.०५ टक्के दरमहा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गुंतवणूकीची मुद्दल हवी असल्यास एक महिन्यात रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. ही रक्कम विविध व्यवसायात अधिक व्याज दराने गुंतवली जाते. त्यातून व्याज दिले जात असल्याचे शहा यांना सांगण्यात आले. त्यानंतर शहा यांनी या फर्मकडे ४८ लाख रुपयांची गुंतणूक केली. त्या बदल्यात त्यांना प्रॉमिसरी नोट देण्यात आली. त्यावर फर्मच्या संबंधीत व्यक्तींनीही स्वाक्षरी केल्या आहेत. सुरूवातीचे काही दिवस पैसे मिळाले, पण त्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून शहा यांना गुंतवणूकीवर कोणतेही व्याज अथवा मुद्दल रक्कम मिळाली नाही. 

हेही वाचाः- यंदा 'आयआयटी' प्रवेशासाठी 'ही' अट रद्द

पैशांसाठी शहा यांनी कंपनीत तगादा लावला असता नोटबंदी (Denomination )मुळे व्यवसाय ठप्प असल्यामुळे देण्यास असमर्थता दर्शवली. वारंवार मागणी करूनही व्याज व मुद्दल न मिळाल्यामुळे अखेर शहा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. शहा यांच्यासह आणखी ७७ व्यक्तींचेही पैसे व व्याज देण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले आहेत. ही रक्कम ११ कोटी ८८ लाख रुपये आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा (Economic Crimes Branch ) अधिक तपास करत आहे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा