मुंबई पोलिसांना पत्र लिहून आशिष शेलार यांनी केली ‘ही’ मागणी

वांद्रे परिसरातील ड्रग्ज अड्ड्यांबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची नाराजी ट्विटरहून व्यक्त केली.

मुंबई पोलिसांना पत्र लिहून आशिष शेलार यांनी केली ‘ही’ मागणी
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 'ड्रग्स, पब आणि पार्टी' कल्चरच्या मुद्द्याने, वांद्रे परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज अड्यांची माहिती भाजप नेते अॅड आशिष शेलार यांनी पत्र लिहून पोलिसांना दिली. मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांचं लक्ष वेधलं आहे.

भाजप नेते अॅड आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. शेलार यांनी १४ मार्च २०२० रोजी वांद्रे सीलिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल डिसीपी, अँटी नारकोटिक्स सेलला एक सविस्तर पत्र लिहिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज पार्ट्यांचा मुद्दा पुढे आल्यानंतर आशिष शेलार यांनी वांद्रे परिसरातील ड्रग्ज अड्ड्यांबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची नाराजी ट्विटरहून व्यक्त केली.  ड्रग्सचं सेवन देशातील तरूणांचे आयुष्य उध्वस्त करीत असून मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरूद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तीशी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्रविरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबई हे मुख्य टार्गेट आहे.

हेही वाचाः- मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

वांद्रे, खार, सांताक्रूझ या मतदारसंघ क्षेत्रात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पब पैकी बर्‍याचजणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाईटलाइफ पार्ट्या सुरु असतात. हीच ठिकाणे दुर्दैवाने बेकायदेशीर ड्रगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने हे सारे राजरोस पणे सुरु आहेत, असाही घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. १९९० च्या उत्तरार्धात ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड नष्ट केले, त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या या सर्व ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. अशा नेटवर्कमधील संबंधीत मालमत्ता जप्त करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचाः- भरधाव कारने ४ जणांना चिरडले, क्रॉफर्ड मार्केट येथील घटना

सुशांतसिंग राजपूत यांच्या साथीदारांनी वापरलेल्या बेकायदेशीर ड्रग्स वांद्रे सी लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर, वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुल नगर, नर्गिस दत्त नगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू, वांद्रे पश्चिम, बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन) अरुण कुमार वैद्य नगर समोर, गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी, मुरगन चाळ, सांताक्रूझ पश्चिम, वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्री नगर, ओएनजीसी लेन वरीव पब आणि बार, वांद्रे रिक्लेमेशन या ठिकाणांहून आणल्या गेल्या असाव्यात, असा संशय शेलार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याचे गांभीर्य आता तरी पोलीस प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा