मानखुर्दमधून सराईत दुचाकीचोरांना अटक

  Mankhurd
  मानखुर्दमधून सराईत दुचाकीचोरांना अटक
  मुंबई  -  

  मुंबईत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मालाड, वसई आणि विरार येथे बाईक चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. मात्र तरीही बाईक चोरीच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. पोलिसांनी आता मानखुर्दमधून दोन बाईक चोरांना अटक केली आहे.


  चोरट्यांची रवानगी न्यायायालयीन कोठडीत

  मोहम्मद जीशान मोहम्मद फुरकान अन्सारी (20) आणि जुनेद उर्फ फतेह मोहमद युसुफ खान (19) अशी चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.


  चोरीनंतर करायचे मुंबई दर्शन

  मानखुर्दमधील 36 वर्षांचे रहिवासी मोहम्मद हमीद सिद्दिकी यांनी 9 जुलै रोजी त्यांची नादुरुस्त झालेली दुचाकी वाशी खाडी पुलाजवळ उभी केली होती. पण तिथून ती अचानक चोरी झाली. त्यामुळे त्यांनी मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीनंतर उपनिरीक्षक चंद्रकांत लांडगे आणि प्रवीण भोसले यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.

  याच चौकशीदरम्यान पोलिसांनी यशवंतराव चव्हाण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा दुचाकीला दोन तरुण ढकलून नेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याचे कबूल केले. चोरलेल्या दुचाकीवरून ते आपसात शर्यत लावत आणि मुंबई दर्शनाचा आनंद घेत. त्यानंतर या दुचाकी ते लपवून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून तीन मोटरसायकल आणि दोन अॅक्टिव्हा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील दोन दुचाकी साकीनाका, दोन शिवाजीनगर तर एक देवनारमधून चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली.  हेही वाचा -

  ट्रायलच्या नावावर कल्टी मारणारे बंटी-बबली!

  सराईत दरोडेखोर जेरबंद


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.