मुंबईत चड्डी बनियान गँग पुन्हा सक्रिय?


SHARES

बोरीवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्गावरील हरिओम मोबाइल दुकानाचे छत फोडून चोरांनी तब्बल 1 कोटी रुपयांचे मोबाइल फोन आणि रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

ही सर्व घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

कारण, या फुटेजमध्ये चक्क चड्डी बनियान घातलेले आरोपी दिसून येत आहेत. यावरुन काही काळासाठी गप्प बसलेली चड्डी बनियान गँग शहरात पुन्हा सक्रिय झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या फुटेजच्या आधारे कस्तुरबा पाेलिसांनी तपास सुरू केला आहे.



दुकान केलं पूर्ण साफ!

कस्तुरबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा मार्गावरील डी. एन. माने चाळीतील दुकान क्रमांक 4 आणि 5 मध्ये रमणीक भाई आणि शांतीभाई सत्रा यांचे मोबाइलचे दुकान आहे. हे दुकान या गँगने पूर्ण सफाचट केले आहे.


9 इंचाचे छत फोडले

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे रमणीक भाई यांनी दुकान उघडले. दुकानात शिरल्यानंतर आतील दृष्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. कारण रात्री सामानाने सजलेले त्यांचे दुकान सकाळी पूर्ण रिकामे झाले होते.

त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती कस्तुरबा पोलिसांना दिली. कस्तुरबा पोलिसांनी पंचनामा केल्यावर त्यांना चोर दुकानाचे 9 इंचाचे छत कापून आत घुसल्याचे आढळले. दुकानात लागलेले सीसीटीव्ही तपासल्यावर त्यात चड्डी बनियान घातलेले आरोपी दिसले.

दुकान मालकाच्या मते, दुकानातून 1 कोटी रुपयांचे मोबाइल आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. पोलिसांनी अज्ञात आराेपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.



हे देखील वाचा -

ज्येष्ठ नागरिकांनो, असे तुमच्यासोबतही घडू शकते

'त्या' फोटोत दडलंय कृतिकाच्या हत्येचे गूढ?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा