फरार कोरोना पाँझिटिव्ह आरोपीने पोलिसांच्या दुचाकीला दिली धडक

तिवरेकर पळून गेल्याची कल्पना आरसीएफ पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर होते.

फरार कोरोना पाँझिटिव्ह आरोपीने पोलिसांच्या दुचाकीला दिली धडक
SHARES

राज्याच्या कारागृहांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेसंदिवस वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील ५९६ तर मुंबईतील १८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. कोरोनाबाधित कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असताना. शिवाजीनगरमध्ये कोरोना पॉझीटीव्ह कैदीच पळून गेल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली आहे. संतोष मेहराज तिवरेकर(२०) व इरफान शकीर अली खान(१९) अशी या दोघांची नावे आहेत. यातील तिवरेकर हा चेंबूर परिसरात दुचाकीवरून फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याचा पाठलागही केला. मात्र एका वळणावर पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन आरोपी पून्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी ठरले आहे. या प्रकरणी आरोपीवर आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून या अपघातात दोन्ही पोलिस जखमी झाले आहेत.

हेही वाचाः- ‘या’ मालिकेतून ११ दिवसांत बाप्पाच्या ११ पौराणिक कथांचा होणार उलगडा

चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिवरेकर आरोपीने एका व्यक्तीवर पूर्व वैमन्यसातून प्राणघातक हल्ला केला होता. त्याला पोलिसांनी २९ जूनला अटक केली होती. तर दुसरा आरोपी खान याने अप्लवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्याला पोलिसांनी १ जुलैला अटक केली होती. पोलिसांच्याताब्यात असतानाच गेल्या आठवड्यात आरोपी संतोष आणि इरफानमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यानुसार त्यांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार गोवंडी येथील शिवाजी नगरमधील कोविड सेंटरच्या ६०२ क्रमांकाच्या विलगीकरण खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीला ठेवले होते. त्यांच्यावर पाठत ठेवण्यासाठी दोन सुरक्षा रक्षकही होते. मात्र त्यांना कोविड सेंटरच्या बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे काही तासासाठी का होईना ते पोलिसांच्या नजरे आड होते. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी पळण्याचा कट आखला. या दोघांनी १३ जुलैच्या मध्यरात्री त्याच्या खोलीचा दरवाजाची कडी तोडून पळ काढला. ते इतक्या सावध रित्या तेथून पळून गेले त्याची कल्पना त्या आरोपीच्या खोलीतील तिसऱ्या व्यक्तीलाही आली नाही.

हेही वाचाः- स्टँडअप कॉमेडियन महिलेला पून्हा बलात्काराची धमकी, दोघांना अटक

दरम्यान तिवरेकर पळून गेल्याची कल्पना आरसीएफ पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर होते. काही दिवसांपूर्वी तिवरेकर हा चेंबूर परिसरात दुचाकीने फिरताना गस्तीवरील दोन पोलिसांना आढळला. त्यानुसार पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना हुलकवणी देऊन तिवरेकरने पळ काढला. पोलिसांनी त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. एका ठिकाणी तिवरेकर पोलिसांच्या तावडीत सापडणार तोच त्याने पोलिसांच्या गाडीला जोरदार घडक दिली. या अपघातात पोलिसांची दुचाकी पडली आणि तिवरेकर हाताला लागण्यापासून राहिला. या अपघातात दोन्ही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर झेन या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी तिवरेकर विरोधात  ३०७, ३५३, ४२७, भा.द.वि कलमांतर्गत नवा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस तिवरेकरचा शोध घेत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा