स्टँडअप कॉमेडियन महिलेला पुन्हा बलात्काराची धमकी, दोघांना अटक

बीग बॉस प्रतियोगी हिंदुस्तानी भाऊपासून प्रेरीत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनीही त्याच्या सारखाच व्हिडीओ बनावण्याचा प्रयत्न केला होता.

स्टँडअप कॉमेडियन महिलेला पुन्हा बलात्काराची धमकी, दोघांना अटक
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी एका स्टँडअर काँमेडियन महिलेला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. काहीनी तर तिला जिवेर मारण्याची आणि तिच्यावर बलात्कार करण्याची धमकीही दिली होती. मात्र पोलिसांनी वेळीच धमकी देणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र पून्हा एकदा तसाच एक प्रकार पुढे आला आहे. या  प्रकरणी पोलिसांनी विरार येथून दोघाजणांना अटक केली आहे. अश्रफ शेख व विराट शर्मा अशी या दोघांची नावे आहेत.

विरारचे रहिवाशी असलेले हे दोन्ही आरोपी १०वी नापास असून उदरनिर्वाहासाठी चालवण्यासाठी रिक्षा चालवतात. दोघेही उमेश दादाचे मित्र आहेत. हे सर्व बीग बॉस प्रतियोगी हिंदुस्तानी भाऊपासून प्रेरीत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनीही त्याच्या सारखाच व्हिडीओ बनावण्याचा प्रयत्न केला होता. अशाच प्रकारचा एक व्हीडीओ केल्याप्रकरणी वडोदरा पोलिसांनी शुभम मिश्रा नावाच्या युट्युबरला अटक केली होती. एका महिला स्टँड अप कॉमेडियनने शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्यातून वाद उसळला होता. सर्व स्तरातून या महिला कॉमेडिअन विरोधात टीका होत असताना एका व्हिडिओमध्ये या तरुणाने सर्व सीमा पार करून या महिला कॉमेडियनला अश्लील भाषेत धमकावले होते. त्याचवेळी उमेश दादानेही अशाच पद्धतीचा व्हिडीओ टाकून अश्लील शब्दात या महिलेला धमकावले होते.

हेही वाचाः - मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस

याप्रकरणी सायबर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शेख व शर्मा या दोघांचाही याप्रकरणात सहभाग आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पोलिस त्यांचा माग घेत होते. अखेर गुरूवारी रात्री त्यांना विरार येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणानंतर या दोघांनीही व्हिडीओ बनवून आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.

हेही वाचाः-ठाण्यातील लाॅकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवला

संबंधित विषय