डाॅक्टरनेच केला नर्सचा घात, मालाडमधील घटना

नर्स महिलेला संशय आल्यामुळे तिने अखेर त्याला व्हिडीओ कॉल केला. त्याने तो उचलला नाही. अखेर तिचा संशय आणखी बळकट झाला.

डाॅक्टरनेच केला नर्सचा घात, मालाडमधील घटना
SHARES

फेसबुकवर मैत्री करून लंडनमधील तोतया डॉक्टरने मालाडमधील परिचारीकेला(नर्स) ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने मैत्री केल्यानंतर तक्रारदार नर्सला ४९ लाखांचे गिफ्ट पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक केली. या प्रकरणी मालाड पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

तक्रारदार महिला सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तर तिचा पती महापालिकेत कामाला आहे. मार्च २०२० मध्ये तक्रारदार महिलेला अलेक्स विल्फ्रेड नावाच्या लंडनमधील डॉक्टरने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. तक्रारदार महिलेने त्याची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये ऑनलाईन बोलणे सुरू झाले. तेथून मोबाईल  क्रमांकही त्यांनी एकमेकांना दिले. त्यानंतर १५ ऑगस्टपासून दोघेही फोनवरून एकमेकांसोबत बोलू लागले. त्यानंतर १७ ऑगस्टला विल्फ्रेडने सरप्राईज गिफ्ट पाठवले असल्याचे सांगितले. त्यानंतर काही तासांतच तक्रारदार महिलेला दिल्ली विमातळावरील कार्गो विभागातून अंजली शर्मा नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला. तुमच्यासाठी आलेल्या पार्सलमध्ये ३५ लाखांची रोख व १४ लाखांचे सोने असल्याचे सांगितले. ते घेण्यासाठी तुम्हाला ३० हजार रुपये भरावे लागतील, असे शर्माने ांगितले. तक्रारदार महिलेने पैसे भरल्यानंतर तिने अतिरिक्त पैशांसाठी दंड म्हणून एक लाख १० हजार रुपये भरावे लागतील असे तिने सांगितले.

हेही वाचाः- भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी NIA ने तिघांना केली अटक

२७ ऑगस्टला तक्रारदार महिलेला एक ई-मेल आला. त्यात आरबीआयच्या नियमानुसार परदेशी पार्सलसाठी कॉट कोड आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले होते. त्यासाठी आणखी रक्कम या महिलेला भरण्यासाठी सांगण्यात आले. थोडे थोडे करून महिलेकडून साडे सतरा लाख रुपये दंडाच्या नावाखाली घेण्यात आले. त्यानंतर तिने विल्फ्रेडला दूरध्वनी केला असता त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तसेच आपण स्वत येऊन पार्सल सोडवतो असे सांगितले. त्यानंतर दिवसाभराने विल्फ्रेडचा दूरध्वनी आला. त्याला दिल्लीत अटक करण्यात आल्याचे सांगितले. त्याला सोडवण्यासाठी साडे पाच लाखांचा दंड भरावा लागेल, असेही त्याने सांगितले. तक्रारदार नर्स महिलेला संशय आल्यामुळे तिने अखेर त्याला व्हिडीओ कॉल केला. त्याने तो उचलला नाही. अखेर तिचा संशय आणखी बळकट झाला. अखेर शुक्रवारी तिने याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसणूक व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा