• दगडी चाळीत 'डॅडी'चे जोरदार स्वागत
SHARE

मुंबईतील कुख्यात डॉन अरूण गवळी उर्फ डॅडी 28 दिवसांच्या फर्लो रजेवर नागपूर तुरुंगातून बाहेर आला असून, शुक्रवारी संध्याकाळी तो दगडी चाळीत पोहोचला. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि हितचिंतकांनी जोरदार स्वागत केले.

[हे पण वाचा - 'डॅडी' पुन्हा तुरुंगाबाहेर]

अरूण गवळी उर्फ डॅडी शुक्रवारी दगडी चाळीत पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी औक्षण करून त्याचे स्वागत केले. यानंतर गवळीने दगडी चाळीतील देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले. यावेळी दगडी चाळीतील रहिवासी आणि डॅडीचे हितचिंतक उपस्थित होते.

[हे पण वाचा - 'डॅडी'साठी गीता गवळी 'वर्षा'दारी]

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. या तुरुंगवासा दरम्यान त्याने फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई महापालिका निवडणूका असल्याने त्यावेळी त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. अखेर 27 एप्रिल रोजी त्याने केलेल्या पुनर्विचार अर्जावर न्यायालयाने त्याला फर्लो मंजूर केला.

[हे पण वाचा - 'अरुण गवळी संत फकीर']

संबंधित विषय
ताज्या बातम्या