अमेरिकेहून घरी परतलेल्या मुलाला दिसला आईचा सांगाडा

 Andheri west
अमेरिकेहून घरी परतलेल्या मुलाला दिसला आईचा सांगाडा
Andheri west, Mumbai  -  

ओशिवरातल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू वस्तीत राहात असलेल्या एका 65 वर्षांच्या महिलेचा सांगाडा घरातच आढल्याने खळबळ उडाली आहे. आशा साहानी असे या महिलेचे नाव आहे.

वेल्सकॉड या इमारतीतील 10व्या मजल्यावर आशा एकट्याच राहात होत्या. त्यांच्या पतीचे 2013 मध्ये निधन झाले होते. त्यांचा मुलगा ऋतुराज हा आयटी इंजिनियर असून तो आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत रहातो. पण शनिवारी तो मुंबईला आईला भेटण्यासाठी आला, तेव्हा त्याने दार ठोठावले. पण बराच वेळ झाला तरी आई दार उघडत नसल्याने त्याने दरवाजा तो़डला आणि सगळा प्रकार उघड झाला. घरातल्या बेडवर आईचा सांगाडाच त्याला दिसला. ही माहिती त्याने लोखंडवाला पोलिसांना दिली. तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत महिलेचा सांगाडा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. ही आत्महत्या, हत्या की नैसर्गिक मृत्यू? याचा तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अशीही माहिती मिळत आहे की, मुलाचे आपल्या आईशी दीड वर्षांपर्यंत फोनवर देखील बोलणे झाले नव्हते. 5 ते 6 कोटी किंमत असलेल्या त्या फ्लॅटमध्ये चार ते पाच महिन्यांपासून ही वृद्ध महिला बेडवर मृतावस्थेत पडून होती. इतके दिवस उलटल्यानंतरही शेजाऱ्यांनाही काहीच कसे कळले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.हेही वाचा -

मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रन, एकाला अटक

दारूड्या नातवाकडून आजीचा विनयभंग


Loading Comments